घरपालघरट्रान्सफाॅर्मर आणि जनतेची सुरक्षा दोन्ही उघड्यावर ! महावितरणचे दुर्लक्ष

ट्रान्सफाॅर्मर आणि जनतेची सुरक्षा दोन्ही उघड्यावर ! महावितरणचे दुर्लक्ष

Subscribe

याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात शॉक लागून मनुष्य आणि जनावरांचे प्राण गेलेले आहेत. पण, महावितरण त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे.

वसईः वसई विरार परिसरात अनेक भागात सुरक्षा कुंपण नसलेले अनेक उघडे ट्रान्सफाॅर्मर असून त्यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याचा धोका असल्याकडे सामाजिक कार्यकर्ते संजय राणे यांनी महावितरणचे लक्ष वेधले आहे.बुधवारी संध्याकाळी क्लासवरून घरी परत निघालेल्या तनिष्का कांबळे हिचा साचलेल्या पाण्यात शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात शॉक लागून मनुष्य आणि जनावरांचे प्राण गेलेले आहेत. पण, महावितरण त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे.

सुरक्षा कुंपण नसलेले ट्रान्सफाॅर्मर आणि उघड्या डिपी जिवीतहानी होण्यास कारणीभूत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विरार पूर्वकडील कारगील नगर येथे वर्दळीच्या रस्त्यावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर‘ बसवण्यात आलेला आहे. या ट्रान्सफॉर्मरवरील विद्युत भार पाहता सातत्याने याठिकाणी शॉर्टसर्किटसारख्या घटना घडत असतात. कित्येकवेळा वीज वाहक तारा तुटून पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटनांची शक्यता अधिक प्रमाणात बळावते. या ट्रान्सफॉर्मरसभोवती लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आलेले आहे. मात्र, पावसाळ्यातील विद्युत अपघात लक्षात घेता या कुंपणाची सुरक्षितता तपासण्यात यावी. शिवाय या कुंपणाच्या आत आणि सभोवताली साचलेला कचरा स्वच्छ करण्यात यावाअशी मागणी राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -