विश्वासाला तडे, नवीन सिमेंट रस्त्यांना भेगा

यामुळे काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने त्याठिकाणी रस्त्याला चक्क तडे गेले आहेत,अशी नागरिकांची तक्रार आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत सिमेंट रस्त्यांचा गाजावाजा करीत भाजप सत्ताधार्‍यांनी सलग सत्ता मिळविली होती. पण या सिमेंट रस्त्यांच्या विकासाच्या मागे ‘दिव्याखाली अंधार’ असल्यासारखीच गत झाली. शहरात अनेक ठिकाणी या नवीन सिमेंट रस्त्यांना चक्क मोठ-मोठ्या भेगा पडून तडे गेले आहेत. तर काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. महापालिका याप्रकरणी एकतर झोपेत आहे किंवा झोपेचे सोंग घेत असल्यासारखीच वागत आहे,असा आरोप नागरिक करीत आहेत.

मीरा – भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नवीन सिमेंट रस्ता बनविणे कामी कंत्राटदार मे. जिजाऊ कन्ट्रक्शन रोड बिल्डर प्रा.ली. या ठेकेदारांनी एकाच निविदेत भाईंदर पूर्वेच्या गोळवलकर गुरुजी ते स्व. प्रफुल पाटील चौक पर्यंतचा सिमेंट रस्ता तयार करणे ८ कोटी १३ लाख ८९ हजार २४७ रुपये, मिरारोड पूर्व परिसरातील शिवपूजा इमारत (विजय पार्क ) ते प्लेझंट पार्क रोडवरील सिल्व्हर क्राऊन इमारतीपर्यंतचा रस्ता तयार करणे १२ कोटी ४४ लाख ३८ हजार १२९ रुपयांच्या व मिरागाव येथील अमर पॅलेस ते कोंबडी गल्ली पर्यंतचा रस्ता सीसी तयार करणे ७ कोटी २५ ५७ हजार ९५६ रुपये आणि मिरारोड मधील पूनम गार्डन १४ कोटी ८० लाख ४६ हजार २२१ हि कामे करण्यासाठी एकाच निविदेत चार कामे कमी दराने निविदा भरून अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे कामे सुरूअसल्याचा आरोप होत, जनतेचा कररूपी पैसा वाया जात असल्याची चर्चा आहे. तसेच नवीन सिमेंट रस्ता बनवत असताना काही ठेकेदारांनी काही वस्तू न-टाकताच कामात टाकल्याचे भासवून शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्षात रेतीच्या ठिकाणी संपूर्णपणे दगडी भुसा वापरून कामे चालू आहेत. त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. यामुळे काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने त्याठिकाणी रस्त्याला चक्क तडे गेले आहेत,अशी नागरिकांची तक्रार आहे.

 

प्रतिक्रिया,

याच दीपक हॉस्पिटल ते सेव्हन इलेव्हन शाळेच्या दिशेने आणखी थोडे समोर गेले की आणखीनच धक्कादायक वास्तव दिसून येते. तेथील इंद्रलोक नाका येथे जवळपास ५ हजार चौरस फूट क्षेत्रावर चक्क सिमेंट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. आता काही दिवसांनंतर त्याची मुदतवाढ मागतीलच पण त्याचे कारण गुलदस्त्यात ठेवतील आणि काम मात्र मुदतीत पूर्ण करणार नाहीत हे मात्र तितकेच खरे आहे.

– रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक

पालिकेच्या अभियंत्यांकडून लक्ष देऊन काम करून घेतले जाते. तरीही ज्याठिकाणी नवीन सिमेंट रस्त्यांवर तडे गेलेले आहेत. त्याठिकाणी उच्चतम कारवाई करू व रस्त्यांना तडे जाणार नाही यासाठी पाहणी करू.

– दिपक खांबीत, शहर अभियंता