घरपालघरजव्हार तालुक्यात लाकडी शेती अवजारे वापरण्याला ब्रेक; अत्याधुनिक अवजारांना पसंती

जव्हार तालुक्यात लाकडी शेती अवजारे वापरण्याला ब्रेक; अत्याधुनिक अवजारांना पसंती

Subscribe

जव्हार तालुक्यातील खरीप हंगाम अतिशय उपयुक्त आहे. याच हंगामातील शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर येथील शेतकर्‍यांना लाभदायक ठरत आहे.

जव्हार तालुक्यातील खरीप हंगाम अतिशय उपयुक्त आहे. याच हंगामातील शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर येथील शेतकर्‍यांना लाभदायक ठरत आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत होती. त्यावेळी लाकडी शेती अवजारांचा व शेतीसाठी उपयुक्त अशा साधनांचा सर्रास वापर करण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कृषी क्रांतीने बदल घडवून आणला. त्यामुळे सध्या सगळेच शेतकरी हे अत्याधुनिक कृषी अवजारे वापरण्याकरता अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे लाकडी शेती अवजारे वापरण्याला ब्रेक लागत चालला आहे.

आमच्या खापर पंजोबांपासून आम्ही लाकडी शेती अवजारे वापरत होतो. परंतु त्यात अनेक अडचणी येत असे. आता आधुनिक अवजारे वापरल्याने कष्ट कमी लागत असून कामेही लवकर होत आहेत. मिळणारे उत्पन्न देखील वाढत आहे.
– रतन धिंडा, शेतकरी

- Advertisement -

शासनाच्यावतीने कृषी क्षेत्राच्या विकासाकरता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दिवसेंदिवस प्रगती होत असून नवनवीन शेतीविषयक उपयोगी आधुनिक अवजारे निर्मितीवर भर दिला जात आहे. परिणामी शेती कामासाठी वापरण्यात येणारी लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लाकडी अवजारे बनविण्यासाठी लागणारे लाकूड, मजुरी, मोडतोड झाल्यावर दुरुस्तीला लागणारा वेळ यामुळे अधिक वेळ खर्च होतो. बैलजोडीचा सांभाळ करणेही कठिण होत आहे. बैलजोडीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मातीत पेरणीच्या वेळी शेतात चालणारी लाकडी तिफन आता नजरेआड झाली आहे.

लाकडी अवजारे बनविणे व दुरुस्त करणे कौशल्याचे काम आहे. सध्या हे कारागीर उपलब्ध नसल्याने आणि या कामाला वेळ देखील अधिक लागत असल्याने आधुनिक अवजारे वापरणे सोयीस्कर झाले आहे.
– शशी जाधव, कृषी अभ्यासक

- Advertisement -

अलीकडे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रसामग्रीचा वापर अधिकाधिक होत आहे. पूर्वी बैलजोडी व लाकडी अवजारांच्या सहाय्याने शेतीची कामे केली जायची. मात्र आता शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेतीकामे करत आहेत. शेती कामासाठी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रासह लोखंडी अवजारांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची मशागत करणे हे चित्र दिवसेंदिवस दिसेनासे होत आहे. लाकडी नांगर, वखर, तिफन, पट्टा, फण आदी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागली आहेत.

हेही वाचा – 

‘या’ जिल्ह्यात बियरच्या विक्रीत वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -