घरपालघरकाळशेती नदीवरील पूल खचला; वाहतूक धोकादायक

काळशेती नदीवरील पूल खचला; वाहतूक धोकादायक

Subscribe

जव्हार तालुक्यातील न्याहाळे नांदगाव रस्त्यावरील काळशेती नदीचा पूल मुसळधार पावसाने खचला असून पुलाच्या एका बाजूची संरक्षक भिंत अर्धी पडली आहे.

जव्हार तालुक्यातील न्याहाळे नांदगाव रस्त्यावरील काळशेती नदीचा पूल मुसळधार पावसाने खचला असून पुलाच्या एका बाजूची संरक्षक भिंत अर्धी पडली आहे. तर  उरलेली भिंतसुद्धा पडण्याची शक्यता असून अखेरची घटका मोजत आहे. हा पूल कासा सुर्यानगर लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेत येतो. या पूलावरुन ग्रामस्थांना वाहतुकीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. येथील ग्रामस्थांनी पुलाच्या दुरुस्तीची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार करुनसुद्धा अद्यापही  कोणतेही अधिकारी पाहणीसाठी देखिल फिरकले नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.

काळशेती नदीचा पूल तुटल्याने पुलावरुन तेथील ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पूलाची तात्काळ दुरुस्ती करावी.
– चंद्रकांत रंधा, उपसभापती, जव्हार पंचायत समिती

- Advertisement -

न्याहाळे नांदगाव रस्त्याने टोकरखांडला जाताना हा पूल लागतो. या पूलाचे बांधकाम सन १९७२ साली झाले आहे. त्यांनतर काही वर्षांनी मध्यंतरी पुन्हा या पुलाची डागडुजी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली होती. सन २०१८ साली पुलाच्या संरक्षक भिंतीच्या  दुरुस्तीचे काम झाले होते. तिच पूलाची भिंत ३ वर्षानंतर म्हणजेच आता मागे पडलेल्या मुसळधार पावसाने पडली आहे. हा पूल साधारणतः २० फूट उंच आहे. परंतु यंदा पहिल्यांदाच पुलावरुन पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यात पूलाची भिंत खचली आहे. यामुळे येथील नागरिकांचे वाहतुकीचे मोठे हाल होत आहेत. काळशेती धरणाचा पाण्याचा थिरावा पुलाच्या ५०० मीटर परिसरात पसरला आहे.

काळशेतीचा पूल तुटल्याने या परिसरातील कौलाळे, नांदगाव, भुरीटेक, कुर्लोद या ४ ग्रामपंचायतींचा वाहतुकीला संपर्क तुटला आहे. त्यामुळे या पूलाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -