घरपालघरमहामार्गावर मेंढवण येथे पुन्हा बर्निंग टँकर

महामार्गावर मेंढवण येथे पुन्हा बर्निंग टँकर

Subscribe

या अपघातात टँकरमधील वाहन चालक दीलजित सिंग व इतर दोघे जण जखमी झाले असून त्यांना कासा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डहाणू,मनोर : मुंबई -अहमदबाद महामार्गावर मेंढवन येथील तीव्र वळणावर बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास एका टँकरला भयंकर आग लागली. या आगीत टँकर जळून खाक झाला आहे. या टँकरमध्ये बेंझामिन नावाचे केमिकल होते. टँकरचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आग लागलेल्या टँकर जवळून जाणार्‍या एका ट्रकला सुद्धा आग लागली होती. पण लगेचच अग्निशमन दलाने ती विझविली. या अपघातात टँकरमधील वाहन चालक दीलजित सिंग व इतर दोघे जण जखमी झाले असून त्यांना कासा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती कळताच कासा पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी बोईसर येथील अग्निशमक दलाच्या तुकडीस पाचारण केले. अग्निशामक दलाने येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत टँकर जळून खाक झाला होता. टँकरला लागलेली आग सकाळी 10 वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात धुमसत होती. त्यांनतर सकाळी महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली.
जुनी भयानक आठवण ताजी मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन येथे तीव्र वळण असल्यामुळे येथे वेळोवेळी अपघात घडत असतात. 30 वर्षांपूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा स्फोट होऊन 113 जण मृत्यमुखी पडले होते. त्यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून महामार्गावर एखाद्या टँकरचा अपघात झाल्यास ग्रामस्थ जंगलात पळ काढत असतात. बुधवारी झालेल्या अपघातामुळे देखील इथले ग्रामस्थ घाबरून जंगलात लपून बसले होते. केमिकल टँकरच्या अपघातामुळे लागलेल्या आगीत आपल्या पूर्वजांना गमावलेल्या ग्रामस्थांच्या मनात अजूनही भीती कायम असल्याचे विदारक दृश्य मेंढवण येथे आजही पाहायला मिळते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -