घर पालघर नशेखोरांवर चाप लावण्यासाठी मोहीम हाती

नशेखोरांवर चाप लावण्यासाठी मोहीम हाती

Subscribe

प्रत्येक भागातील गस्तीचे बीट मार्शल निश्चित करून त्यांना एक मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे. ते क्रमांक नागरिकांनाही देण्यात येणार असून, शहरातील नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

जव्हार: जव्हार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी पदभार घेऊन केवळ तीन महिने झाले आहेत. त्यानंतर त्यांनी नशेखोरांवर चाप लावण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नशा पदार्थ विक्री करणार्‍या आणि उपभोग घेणार्‍या नशेखोरांवर भीतीचे सावट आले आहे. जव्हार शहरात नशे खोरीची वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियानांतर्गत जव्हार पोलिसांनी ’अ‍ॅक्शन मोड ’ घेतला आहे. नूतन पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे यांनी ’अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून स्वतः दंडुका घेऊन ते रस्त्यावर उतरले आहेत. गल्लीबोळात नशेखोरी करणार्‍यांवर पोलिसी खाक्या दाखवत कारवाईचा बडगा त्यांनी उगारला आहे. शहरातील बस स्थानक परिसर, न्यायालय इमारत, हनुमान पॉईंट , जुना राजवाडा, सनसेट पॉईंट या ठिकाणी ते स्वतः जाऊन नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. शिवाय,अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नशेच्या गोळ्या पुरवणार्‍यांवरही कारवाई केली जात आहे. प्रत्येक भागातील गस्तीचे बीट मार्शल निश्चित करून त्यांना एक मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे. ते क्रमांक नागरिकांनाही देण्यात येणार असून, शहरातील नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -