घरपालघरअखेर जात पडताळणी कार्यालय पालघरला

अखेर जात पडताळणी कार्यालय पालघरला

Subscribe

ठाण्याच्या चरई येथील जात पडताळणी कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाने पालघर येथे तात्काळ जात पडताळणी (अनुसूचित जमाती) कार्यालय तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले.

ठाण्याच्या चरई येथील जात पडताळणी कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाने पालघर येथे तात्काळ जात पडताळणी (अनुसूचित जमाती) कार्यालय तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले. तसेच पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांनी तातडीने पालघर येथे कर्तव्यावर हजर राहण्यास लगेचच प्रयाण केले. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा येथील आदिवासींची जात पडताळणीसाठी होणारी फरफट अखेर थांबणार आहे.

पालघरवासियांसाठी जात पडताळणी (अनुसूचित जमाती) कार्यालय पालघर ऐवजी ठाण्यात का?, असा जाब विचारत मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या चरई येथील सहआयुक्त तथा, उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग यांच्या कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. पालघर येथे जात पडताळणी कार्यालय तात्काळ सुरू करावे, पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांना तातडीने पालघर येथे कर्तव्यावर हजर राहण्यास आदेश देण्यात यावेत, तसेच शिफारशीशिवाय मागेल त्याला जात पडताळणी दाखला देण्यात यावा. या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. मागण्या तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. अखेर संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे सह आयुक्त तथा, उपाध्यक्ष अरुणकुमार जाधव यांनी विवेक पंडित यांच्यासमोर सर्व मागण्या मान्य करून तसे पत्र दिले. तसेच तातडीने पालघरसाठी अधिकारी वर्ग रवाना केला. यावेळी पंडित यांनी जिल्हाधिकरी पालघर यांच्याशी फोनवरून बोलून कार्यालयासाठी जागेची अडचण सांगितली असता, जिल्हाधिकार्‍यांनी पालघर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा जात पडताळणी कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली.

- Advertisement -

2014 साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा स्वतंत्र आदिवासी बहुल जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश असून वसईचा शहरी भाग सोडला तर सर्वच भाग हा आदिवासी क्षेत्र आहे. असे असताना या जिल्ह्यात 7 वर्षानंतरही अनुसूचित जमाती प्रमाणात पडताळणी व्यवस्था नाही. याच वर्षी याठिकाणी जिल्ह्याचे भल्या मोठ्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र आजही आदिवासींना दिलासा देण्यात व्यवस्था अपयशी ठरली आहे. तलासरी, मोखाडा, जव्हार हे तालुके भौगोलिकदृष्ट्या ठाण्यापासून खुप दूर आहेत. या भागातील नोकरीसाठी धडपडणार्‍या, शिक्षण घेणार्‍या, निवडणुकीत सहभाग घेणार्‍या तरुणांची मोठी फरफट होत आहे.

श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळारामभोईर, सरचिटणीस विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, रामचंद्र रोज, राजेश चन्ने, दशरथ भालके, आत्माराम वाघे, आत्माराम ठाकरे, दिनेश पवार, निलेश वाघ, मुकेश भांगरे, महेश धांगडा, रेखा धांगडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Petrol Price : केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -