घर पालघर पालघर जिल्हयात कृषी विद्यापीठाचे केंद्र

पालघर जिल्हयात कृषी विद्यापीठाचे केंद्र

Subscribe

केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या कृषी प्रवेगक निधीतून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवीन स्टार्ट अप तयार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करावेत आदी मुद्दे आमदार डावखरे यांनी मांडले.

वसईः दापोली कृषी विद्यापीठाने पालघर जिल्ह्यात मंजूर केलेले प्रस्तावित केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्याने केंद्र सुरु होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे यांनी हा मुद्दा मांडला होता. पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन व संशोधन करण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने केंद्र मंजूर केले आहे. मात्र, ते अद्यापी सुरू करण्याची कार्यवाही झालेली नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी केंद्राबाबत कार्यवाहीचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. कौशल्य विकास अंतर्गत वारली पेंटीग, रानभाज्या, चिकू, नाचणी, केळी आणि बांबूसंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक साह्य देऊन मुलांना मार्गदर्शन करावे, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’नुसार जिल्ह्यासाठी चिकू वा बांबूसंदर्भात जीआय मार्किंग करावे, २०४७ पर्यंत भारत सिकलसेल एनीमिया मुक्त करण्याच्या अभियानात देशातील १५७ जिल्ह्यात सुरू होणारी वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज पालघर जिल्ह्यात मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या कृषी प्रवेगक निधीतून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवीन स्टार्ट अप तयार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करावेत आदी मुद्दे आमदार डावखरे यांनी मांडले.

तसेच त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. या मागण्यांबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सकारात्मकता दाखवली. पालघर जिल्ह्यातील एकलव्य रेसिडेंशिअल स्कूलची स्थिती, शेतकर्‍यांना कमीत कमी खत वापरून पिक घेण्याबाबत देण्यात आलेले प्रशिक्षण आदींबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार डावखरे यांनी बैठकीत केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -