घर पालघर चक्क पाण्यातून चोरट्यांचा पाठलाग

चक्क पाण्यातून चोरट्यांचा पाठलाग

Subscribe

रवाब शहा (60)मेरानुर शहा (29)वैभव जाधव (24)अब्दुल शहा (38)व चिराग पाटील (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाडा: तालुक्यातील मेट गावच्या हद्दीत असलेल्या मेटाफिल्ड कॉईल प्रा. लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीतील लोखंडी भंगार सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याची गोपनीय माहिती कुडूस पोलिसांना मिळाली. त्यांनी धाड टाकताच पोलीस आल्याचे लक्षात आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनीही ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला.पळण्याच्या तयार असलेले चोरटे थेट नदीत उतरले.पण नदीत पोहत पाच चोरट्यांना गजाआड केले आहे. हा प्रकार सोमवारी( दि.21)चार वाजण्याच्या सुमारास घडला. रवाब शहा (60)मेरानुर शहा (29)वैभव जाधव (24)अब्दुल शहा (38)व चिराग पाटील (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक कारखाने बंद असून येथे कोणीही नसल्याचा फायदा चोरटे घेत असून बंद कंपनीतील लोखंड भंगार सामानाची चोरी चोरटे करीत आहेत.गॅस कटरच्या सहाय्याने लोखंड तोडून त्याची विक्री करण्याचा धंदा सध्या तालुक्यात जोरात सुरू आहे.तालुक्यातील मेट गावाच्या हद्दीत मेटाफिल्ड कॉईल प्रा. लिमिटेड ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या कंपनीत कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लोखंड सामानाची तोड करण्याचे काम सोमवार (दि.21) सकाळपासून सुरू होते. या बाबतची गोपनीय माहिती कुडूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकाने सदर कंपनीवर धाड टाकली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते, पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघचौरे, पोलीस शिपाई गणेश सोनावणे,राजु गवळी,बाबासाहेब भुगे, जाधव ,जनाठे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -