HomeपालघरCheating :सोनारांची फसवणूक करणार्‍या आरोपीला अटक

Cheating :सोनारांची फसवणूक करणार्‍या आरोपीला अटक

Subscribe

तसेच गुन्ह्यातील १०० टक्के मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले हे तपास करत आहे.

भाईंदर : मीरारोडमध्ये सोनाराच्या दुकानामध्ये जावून ऑनलाईन पेमेंट झाल्याचे दाखवून सोनारांची फसवणूक करणार्‍या आरोपीला मीरारोड गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. मीरा रोड येथील साई सिध्दी ज्वेलर्समध्ये काम करणारे नितु सिंग तुंडावत यांना ते काम करत असलेल्या दुकानामध्ये २४ डिसेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी करून ५१ हजार २०० रूपये हे ऑनलाईन पाठविले आहेत असे दाखवले. तसेच त्यांना पैसे न देता फसवणूक केली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबरच्या तपशीलाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण व जवळपास २०० सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या मदतीने आरोपी निष्पन्न करत रचित राजकुमार रांका (२५ , व्यवसाय अकाऊंट फ्रिलान्सर, रा- अजमेर, राजस्थान) याला गुन्हयात अटक केली आहे. या आरोपीवर दिंडोशी पोलीस ठाणे येथे एक गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच गुन्ह्यातील १०० टक्के मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले हे तपास करत आहे.


Edited By Roshan Chinchwalkar