घरपालघरमुख्यमंत्री येती शहरा, तोची दिवाळी दसरा

मुख्यमंत्री येती शहरा, तोची दिवाळी दसरा

Subscribe

परंतु,आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनांकरिता दौर्‍यावर येणार असल्याने रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे मागच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राई-मुर्धा व उत्तन वासीयांचा रस्ता गुळगुळीत झाला आहे.

भाईंदर : खराब रस्ते,रस्त्यातील खड्डे हे काय भारतीय नागरिकांना नवीन नाहीत.परंतु,एखादी अतिमहत्वाची व्यक्ती जेव्हा या रस्त्यावरून जाणार असते तेव्हा मात्र प्रशासन मोठ्या तत्परतेने अशा खड्ड्यांची डागडुजी करत रस्ते गुळगुळीत करते. असाच प्रकार मिरा-भाईंदर पालिका हद्दीत पहायला मिळत आहे. ज्या ज्या रस्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. ते-ते रस्ते गुळगुळीत करायला प्रशासनाने घेतले आहे. त्यातच उत्तन येथे मुख्यमंत्री चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याने राई-मुर्धा, उत्तन ह्या रस्त्यांची पावसामुळे पडलेल्या खड्यामुळे अक्षरशः चाळण झाली होती. ह्या रस्त्याला केवळ प्रशासनाकडून खडीचा मुलामा देण्यात आला होता.परिणामी स्थानिक रहिवासी त्रस्त झाल्याने तक्रारी करून देखील त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. परंतु,आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनांकरिता दौर्‍यावर येणार असल्याने रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे मागच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राई-मुर्धा व उत्तन वासीयांचा रस्ता गुळगुळीत झाला आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या अंतर्गत रस्त्याच्या तुलनेत सर्वाधिक खड्डे भाईंदर पश्चिमेच्या राई-मुर्धा व उत्तन परिसरातील रस्त्यावर पावसामुळे पडले होते. ह्या रस्त्यावरून खड्डे चुकवत वाहने नागरिकांना घेवून चालवत जावी लागत होती. ह्यावर पालिका प्रशासनाकडून पावसाचा जोर कायम असल्याचे सांगत, खड्डे देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवण्यात आली होती. परिणामी महिनाभर होऊन अधिक काळ खड्डेमय रस्त्याचा सामना स्थानिक रहिवाशांना करावा लागला होता.

- Advertisement -

पालिका आयुक्तांची तंबी
शहरातील अंतर्गत रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी देखील अधिकार्‍यांना रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी तंबी दिली होती. त्यानंतरही ह्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात विकास कामांच्या उद्घाटनांनिमित्त येणार असल्याने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -