घरपालघरमुख्यमंत्र्यांकडून वीज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाचे सांत्वन

मुख्यमंत्र्यांकडून वीज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाचे सांत्वन

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक मदतीने चिमुकल्या विशालची उणीव नक्कीच भरून निघणार नाही.

डहाणू, कुणाल लाडे: डहाणू तालुक्यातील पिंपळशेत येथील विशाल चव्हाण ह्या 6 वर्षीय चिमुकल्यावर वीज पडून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ह्या घटनेची माहिती शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असता त्यांनी तात्काळ ह्या घटनेची दखल घेत मृत चिमुकल्याचा कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्याचे निर्देश पदाधिकार्‍यांना दिले. त्यानुसार गिरीश शिलोत्री, विठ्ठल जोशी, सचिन शिरसाठ आणि हेमंत धानमेहेर यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी तत्काळ सदर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक मदतीने चिमुकल्या विशालची उणीव नक्कीच भरून निघणार नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -