Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर पालघर बोईसर सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येणार

बोईसर सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येणार

Subscribe

या सामुदायिक विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील जोडपी विवाहबद्ध होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.

बोईसर: शिवसेना पालघर जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधू- वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा शनिवार २० मे रोजी बोईसर येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील जोडपी विवाहबद्ध होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.

या विवाह सोहळ्याचे प्रमुख आयोजक जगदीश धोडी यांच्याकडून कार्यक्रमाची आवश्यक ती सर्व जय्यत तयारी केली जात आहे. दुपारी १२.३० वाजताच्या शुभ मुहूर्तावर या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कोरोना काळातील दोन वर्ष वगळून अखंडितपणे आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्याकडून या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असून आतापर्यंत 3 हजार जोडप्यांचे यशस्वीपणे विवाह लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

बोईसर येथील सर्कस मैदान येथे भव्य अशा विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक ती तयारी केली जात असून या ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रविंद्र फाटक, माजी केंद्रीय राज्य मंत्री आनंदराव अडसूळ ,खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, शिवसेना उपनेते राजेश शहा उपनेत्या ज्योती मेहेर,शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, निलेश तेंडोलकर शिवसेना महिला जिल्हा संघटक वैदेही वाढाण,टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे,जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांच्यासह जवळपास १० हजार नागरिक आणि वर्‍हाडी मंडळी उपस्थित रहाणार आहेत.ज्या प्रमाणे एक पिता आपल्या मुला मुलीच्या लग्नात सर्व काही करतो तशाच प्रकारे सर्व संसारोपयोगी वस्तू या विवाह सोहळ्यात वधू वरांना शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -