Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण

शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण

Subscribe

याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी सदर शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल केला. भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणारे कल्पना निशाद यांचा मुलगा जे.एच. पोद्दार भाईंदर पश्चिम या शाळेत सिनियर केजीमध्ये शिक्षण घेत आहे.

भाईंदर:- भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणार्‍या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याला खासगी क्लास घेणार्‍या शिक्षिका प्रतिमा सुभाषचंद्र प्रजापती यांच्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. लाकडी काठीने पाठीवर हातावर डोक्यावर मारले असून मोठ्या प्रमाणात पाठीवर वळ आले आहेत. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी सदर शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल केला. भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणारे कल्पना निशाद यांचा मुलगा जे.एच. पोद्दार भाईंदर पश्चिम या शाळेत सिनियर केजीमध्ये शिक्षण घेत आहे.

शाळेला सुट्टी पडल्याने इंग्रजी कच्ची असल्या कारणाने कल्पना निशाद यांनी त्यांच्या सहा वर्षीय मुलाला परिसरात असलेल्या प्रतिमा प्रजापती यांच्याकडे क्लासेसला पाठवत होते. खासगी शिकवणी शिकत असताना ११ मे रोजी साडेदहाच्या सुमारास कल्पना निशाद त्यांचा मुलगा वय वर्ष सहा हा रडत रडत घरी आला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षिका प्रतिमा हिने मला “संडे-मंडे” ची मधील स्पेलिंग वाचता येत नाही म्हणून खूप मारले आहे. कल्पना यांनी आपल्या मुलाची पाठीवरील परिस्थिती पाहता अमानुषपणे मारहाण केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -