नालेसफाईच्या कामावर बालमजूर; महापालिकेच्या ठेकेदाराचा प्रताप

मीरा भाईंदर महापालिकेच्या सफाई ठेकेदाराने गटार आणि नाले सफाईच्या कामात बाल मजूरांचा वापर केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात वेठबिगारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या सफाई ठेकेदाराने गटार आणि नाले सफाईच्या कामात बाल मजूरांचा वापर केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात वेठबिगारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून गटार व नाल्यातील कचरा बाहेर काढण्याच्या कामासाठी मे. एम. ई. प्रोजेक्ट ली. ह्या कंपनीला यंत्र सामुग्री वाहने व मजूर पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला आहे.

मीरारोडच्या विनय नगर परिसरातील रस्त्याच्या बाजूला गटारामधील गाळ काढण्यासाठी बाल मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेत असल्याचे निदर्शनास आल्याने भाईंदर परिमंडळ विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी विनयनगर चंदनशांती पार्क भागात जाऊन कारवाईचे आदेश दिले होते. यावेळी पोलिसांना पाच बाल मजूर नालेसफाईचे काम करीत असताना कामात पाच बाल मजूर काम करीत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्या बाल मजूरांची सुटका केली. सुजित नारायण सोनी (१६), भूपती बाळराज सिएच (१७ वर्ष ३ महिने) असून ते मुर्धा गावातील आहेत. रोहित बाबू हांडे (१७)), आशिष संतोष पवार (१६), लक्ष्मण दशरथ चव्हाण (१७) हे बालकामगार मोर्वा गावातील आहेत. ठेकेदार मनोज मयेकर आणि त्यांचे सुपर वायझर रमेश साहेबराव काळे (३५) यांच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

व्हेंटिलेटरवरील रुग्ण कधी कमी होणार?