घरपालघरबोईसर ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी नागरिकांची मागणी

बोईसर ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी नागरिकांची मागणी

Subscribe

स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी आपापले हितसंबंध जोपासण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत नगरपरिषद ही आजतागत होऊ शकली नाही . या संपूर्ण परिसराचा कारभार एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असावा यासाठी विरोध करतात का असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे .

बोईसरमध्ये ग्रामपंचायत लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होणे म्ह्णूनच बोईसर नगरपरीषद किंवा नगरपालीका करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. बोईसर नगरपरीषद अस्तित्वात येईल या आशेवर असलेल्या बोईसर मधील नागरिकांची राजकीय ईच्छाशक्ती नसलेल्या राजकीय पुढाऱ्यांनीच भ्रमनिराश केल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे. बोईसर नगरपरिषद व्हावी यासाठी शासनाकडे अनेकवेळा अहवाल सादर करण्यात आले आहेत मात्र हे सर्व अहवाल मंत्रालयात धूळ खात पडून आहेत. त्यावर पुढे काहीच घडले नाही.

हे ही वाचा – ‘तो त्यांचा आवडता शब्द’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीसांना खोचक टोला

- Advertisement -

नगरपालिकेची मागणी –

पालघर बोईसर मुख्य रस्स्यावर जिल्हाधिकारी कार्यलय आहे . पालघर बोईसर हे ११ किमी असले तरी दोन्ही भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. बोईसर व लगतच्या ग्रामपंचायकतींचा नागरी भागामुळे शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे मुख्य बाजार पेठ , रेल्वे स्टेशन,बसस्थानक , रिक्षा स्टँड, बँक ,पोस्ट ,दुकाने मॉल, आठवडे बाजार, शाळा या बोईसर ग्रामपंचायत हद्दीत आहेत तसेच २५ ते ३० हजार कामगार, प्रवाशी येथे येत असतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वावर असतो. बोईसर देशातील सर्वात मोठी तारापूर औदयोगिक वसाहत देशातील पहिले अणुशक्ती केंद्र असून देखील आजपर्यंत या गावांना ग्रामपंचायतीच्या भरवश्यावर काम करावे लागते. स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी आपापले हितसंबंध जोपासण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत नगरपरिषद ही आजतागत होऊ शकली नाही . या संपूर्ण परिसराचा कारभार एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असावा यासाठी विरोध करतात का असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे .

- Advertisement -

तसेच स्थानिक नेते देखील जनतेला वेळोवेळी खोटी आश्वासन देतात येथील लोकप्रतिनिधी केवळ निवडणूका काळापूर्तीच नागरीकांना भाबडी आश्वासन देतात , राजकीय ईच्छाशक्ती दिसून आली नाही त्यामुळे पालघर नगरपरिषद बोईसर ग्रामपंचायत विकास होताना दिसत नाही. सुसज्ज रस्ते , गटारे , कचरा व्यवस्थापन , वाहन स्थळ , उद्याने , मैदान , पथदिवे आणि सांडपाणी निचरा होण्यासाठी बोईसर मध्ये दयनीय अवस्था झाली आहे . शहरात एकही उद्यान व मैदान नाही मैदानसाठी राखीव ठेवलेले भूखंड विकासकांनी गिळंकृत केले. बोईसर शहर असल्याचे भासवून येथील परिसरात गृह प्रकल्प उभारले जात आहेत अनेक विकासक नकश्यावर सुंदर रस्ते सुविधा दाखवून त्याची जाहिरात करत आहेत . त्यातच घराच्या किंमती सामन्याच्या आवाक्याबाहेर असल्याने बेकायदा बांधकाम उत आलेला आहे

हे ही वाचा – ‘संजय शिरसाटांचे ट्विट तांत्रिक चुकीमुळे नाही तर….’ राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

चौकट –

बोईसर परिसरात औदयोगिक वसाहत हद्दीत ८ ग्रामपंचायती बोईसर , सरावली, बेटेगांव, खैरेपाडा,कोळवडे, कुंभवली, पास्थल , साळवड या ग्रामपचायत आहेत बोईसर भागात अनेक मोठमोठ्या कॉलनि आहेत. बोईसर शहरात हद्दीत तारापूर औदयोगिक वसाहत , Taps , BARC, अंतरराष्ट्रीय अस्थपणा
त्यांना मूलभूत सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीचे काम आहे. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा नाही. त्यामुळे आपतकालीन परिस्थिति मध्ये मोठ्या प्रमनात आर्थिक व जीवित हानी होत असते. येथील ग्रामपंचायतींना वाढत्या लोकसंख्येला सोई सुविधा पुरविणे आवाक्याबाहेर जात आहे
बोईसर पालघर महानगरपालिका झाल्यास बोईसर पालघर भागातील विकासाला अधिक गती मिळू शकत असल्याने याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे .

 

केंद्र सरकारचे ४ ते ५ ड्रीम प्रोजेक्ट या पालघर बोईसर परिसरातून –
वाढवण बंदर , मुंबई वडोदरा (एक्स्प्रेस ) द्रुतगती महामार्ग , बुलेट ट्रेन

केवळ आश्वासने –

बोईसर नागरपरिषद व्हावी यासाठी शासन दरबारी अनेकदा अहवाल सादर करण्यात आले आहेत मात्र अनेक वर्षे अहवाल मंत्रालयात धूळ खात पडून आहेत.

ग्रामपंचायतच नगरपरिषद रूपांतर करण्यात अयशस्वी –

१ ) २०१२ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोईसर येथील जाहीर सभेत नगर पंचायत प्रस्ताव आल्यास तातडीने मंजुरी दिली जाईल आश्वासन दिले होते

२) २०१४ नव्याने पालघर जिल्हा निर्मिती नंतर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे बोईसर मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी नगरपरिषद होणे अतिशय गरजेचे असल्याचे म्हटले होते बोईसर नगरपरिषद बाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले .

3 ) पालघर जिल्हा निर्मितीनंतर
बोईसर नगर परिषद होणे आवश्यक असल्याबाबत
अनुकूल अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता तरीही तत्कालीन युती सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही

4) 2020 मध्ये बोईसर नगर परिषद व्हावी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्हाधिकारी यांना बोईसर मधील शिवसेना पदाधिकारी यांच्यासह निवेदन दिले होते.
निवेदन – बोईसर ग्राम पंचायतीचे नगारपरिषद मध्ये रूपांतरित आजूबाजूच्या ग्रंपंचायतीचा समावेश नगारपरिषद मध्ये करणे या संदर्भांत पालघर जिल्हा परिषद शिवसेना – भाजप वर्चस्व होते त्यावेळी अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे होते तसेच यातच राज्यात सत्येत “नगरविकास” खातेही सेनेकडे होते. नगरविकास मंत्रालय सांभाळले तसेच पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोईसर शहर विकसित “नगरपालिका” स्वप्न पूर्ण करतील का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या संदर्भात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खासदार- राजेंद्र गावित – पालघर

२०२० मध्ये बोईसर नगरपरिषद व्हावी असा प्रस्थाव निवेदन , जिल्हाधिकारी यांना दिले आहे. नगर परिषद किंवा नगरपालिका या संदर्भात मासिक सभेत ठराव मंजूर झालेला आहे नगर परिषद किंवा नगरपालिका झाल्यास निधि मध्ये वाढ होऊन विकास कामे जलद गतीने होतील. १९९३ ल शासनाचे ग्रामपंचायतीकडून सदर माहिती मा. तहसिलदार पालघर यांना सादर केलेली आहे. तेव्हा पासून सदर प्रस्ताव प्रलंबित आहे.

कमलेश संखे – ग्रामविकास अधिकारी बोईसर ग्रामपंचायत

सन १९८८ पासून सरकारने बोईसर येथे स्वतंत्र नगारपरिषद व्हावी म्हणून पत्र व्यवहार केलेला आहे. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीने व नागरिकांनी देखील अनेक वेळा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. बोईसर ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणणेनुसार ५६४१२ एवढी आहे. तरंगती लोकसंख्या १ लाख्याच्या वर आहे. तारापूर एम.आई. डी. सी. चे क्षेत्र ग्रामपंचायतीची कार्यक्षेत्रा जवळ असल्याने झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. मात्र एम.आई. डी. सी. क्षेत्राचा भाग बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रात येत नाही. बोईसर , काटकर, दांडी (लोखंडी पाडा) 3 ही महसूल गांवे आहेत.

किनी – ग्रामविकास अधिकारी सरावली ग्रामपंचायत

२०११ च्या जणगनेनुसार २६४८५ तरंगती लोकसंख्या ७० हजार आसपास आहे सरावली हे महसूल गांव आहे . सरावली खाडी – त्रिवेदिनगर विद्यानगर पालघर रोड – संजयनगर- धोंडीपूजा – अवधनगर टाकी नाका -संतोषी नगर कार्यक्षेत्र आहे.

हे ही वाचा –  चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -