घर पालघर काशीमीरा ते उत्तन बससेवा सुरु करण्याची नागरिकांची मागणी

काशीमीरा ते उत्तन बससेवा सुरु करण्याची नागरिकांची मागणी

Subscribe

तर पालिकेला शासनाकडून नव्याने ५७ परिवहन बसेसमधून दोन- तीन बसेस नियमित द्याव्यात त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल आणि त्यातून पालिकेलाही उत्पन्न मिळेल अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या गोराई परिसरात असलेल्या पॅगोडा येथे जाण्यासाठी काशीमीरा येथून मीरा -भाईंदर परिवहन सेवेची बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे काशीमीरा येथून भाईंदर पश्चिम, उत्तन ते गोराई पॅगोडापर्यंत मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सेवा सुरू करण्याची मागणी आदर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे. तर पालिकेला शासनाकडून नव्याने ५७ परिवहन बसेसमधून दोन- तीन बसेस नियमित द्याव्यात त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल आणि त्यातून पालिकेलाही उत्पन्न मिळेल अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

मीरा- भाईंदर शहरात जाण्यासाठी काशीमीरा हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. शहराबाहेरील नागरिकांना येथूनच भाईंदरला जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे काशीमीरा पासून गोराई पॅगोडा बस सेवा सुरु केल्यास भाईंदर पश्चिम, मुर्धा, राई, मोरवा, डोंगरी, उत्तन, गोराई चौपाटी, गोराई गाव व पॅगोडा येथे जाणार्‍या नागरिकांना प्रवास करण्यास सोईस्कर होईल व त्यांना चांगली सुविधा मिळेल. या भागातून प्रवाशांची जाणारी संख्या मोठी आहे. पॅगोडा किंवा गोराईला जायचे असेल काशीमीरा येथून बस सेवा उपलब्ध नसल्याने भाईंदर पश्चिमेला जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. महापालिकेने लवकरात लवकर काशीमीरा येथून पॅगोडा येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

मीरा- भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पालिका नवीन ५७ इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ९ मीटर लांबीच्या एकूण ३२ नॉन-एसी बस तर १२ मीटर लांबीच्या एकूण २५ बस शहरात येत्या काही काळात रुजू होणार आहेत. १२ मीटर लांबीच्या २५ बसपैकी एकूण १० बस या एअर कंडिशन असणार आहेत. तर १५ बस या नॉन एसी असणार आहेत. त्यापैकीच दोन ते तीन बसेस काशीमीरा ते गोराई पॅगोडा सोडाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -