घरपालघरइलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा नागरिकांनी घेतला शॉक

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा नागरिकांनी घेतला शॉक

Subscribe

यासाठी लोखंडी किंवा इलेक्ट्रॉनिक काटे वैधमापन करण्याकरिता 1300 रुपये खर्च येत असतो. हा खर्च वाचवणे किंवा शेतकर्‍याने आणलेल्या धान्याच्या वजनात गफलत करणे या दोन बाबी बाबत नागरिकांत संशय निर्माण होत आहे.

जव्हार: जव्हार तालुक्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी नजिकची व सोयीस्कर अशी बाजारपेठ म्हणजे जव्हार शहर. शहरात आल्यानंतर भाजी खरेदी करण्यापासून ते अनेक जीवनावश्यक जिन्नस खरेदी करण्यापर्यंत वस्तू या मापणावर खरेदी केली जात आहेत. शेतकरी आपल्या जवळचे धान्य घेऊन काही व्यापार्‍यांकडे देत आहेत आणि त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू घेत आहेत. परंतु ,शहरात इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा सर्रास वापर होत आहे.परंतु या वजन काट्यांची पडताळणी ही वर्षभरातील एकदा नोव्हेंबरमध्ये 15 दिवसांचे शिबिर लावून करण्यात येत असते. यासाठी लोखंडी किंवा इलेक्ट्रॉनिक काटे वैधमापन करण्याकरिता 1300 रुपये खर्च येत असतो. हा खर्च वाचवणे किंवा शेतकर्‍याने आणलेल्या धान्याच्या वजनात गफलत करणे या दोन बाबी बाबत नागरिकांत संशय निर्माण होत आहे.

ज्या ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतीमालाची खरेदी होते, त्या ठिकाणावरील वजन काट्यांची पडताळणी वेळेवर होणे गरजेचे आहे. वजन, माप ,काटे चांगले असल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही. वैध मापनशास्त्र यंत्रणेने लक्ष देत काट्यांची पडताळणी करावी.
विनोद घोडके,सामाजिक कार्यकर्ते,जव्हार

- Advertisement -

जव्हार शहरात वजन काट्यांची पडताळणी बाबत मौखिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत पुढील कारवाई करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
शिवाजी कांबळे, वैध मापन निरीक्षक,पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -