Eco friendly bappa Competition
घर पालघर नगरपरिषदचा कर थकवणार्‍यांच्या मालमत्ता सिल

नगरपरिषदचा कर थकवणार्‍यांच्या मालमत्ता सिल

Subscribe

एप्रिलपर्यंत कर न भरणार्‍या कर धारकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद मार्फत देण्यात आला आहे.

डहाणू : डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर धारकांवर (घरपट्टी) मालमत्ता सिल करणे आणि जप्त करणे अशी कारवाई करण्यात येत असून एप्रिलपर्यंत थकीत कर भरणा न केल्यास मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा नगरपरिषद मार्फत देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या थकीत कर धराकांमध्ये कारवाईच्या भीतीचे सावट पसरले आहे.
नगरपरिषदेचा कर थकवणार्‍यांविरुद्ध नगरपरिषदेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने थकीत कर धारकांना 11 फेब्रुवारी रोजी डहाणू न्यायालयात येण्याची नोटीस बजावली. त्यानुसार न्यायालयात हजर होणार्‍यांना थकीत कराचे हफ्ते करून देण्यात येऊन कर भरण्याविषयी सुचवण्यात आले होते. त्यावेळी नगरपरिषदेचा साधारण 40 लाख रुपये थकीत कर वसूल करण्यात यश आले. न्यायालयाच्या नोटीस नंतरही मालमत्ता कर थकवणार्‍या कर धारकांच्या मालमत्ता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सिल करण्यात आल्या आहेत. यामध्ये साधारण 253 मालमत्ता सिल व जप्त करण्यात येऊन त्यांना एप्रिलपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत कर न भरणार्‍या कर धारकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद मार्फत देण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 अखेर नगरपरिषद क्षेत्रातील एकूण मालमत्ता धारकांचा 8 कोटी 24 लाख रुपये इतका कर नगरपरिषद कडे जमा होणे अपेक्षित होते. त्यातील 6 कोटी 90 लाख रुपये कर नगरपरिषदेला प्राप्त झाला असून अजून साधारण 1 कोटी 30 लाख रुपये थकबाकी येणे आहे. वर्षानुवर्षे नगरपरिषदेचा कर थकवणार्‍या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता सिल करण्यात आल्या असून नवीन आर्थिक वर्षात या मालमत्तांचा लिलाव करून नगरपरिषदेचा कर वसूल करण्याची भूमिका नगरपरिषदेने घेतली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -