घरपालघरआमसभेत सर्वसामान्यांचा आवाज दणाणला

आमसभेत सर्वसामान्यांचा आवाज दणाणला

Subscribe

यावेळी वनविभागाकडून आसे भागात मागील चार वर्षात एकही काम केले नसल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी वनविभागाचे अधिकारी निरुत्तर झाले .

मोखाडा : तब्बल ९ वर्षांनी होणार्‍या आमसभेसाठी मोखाडा तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी जवळपास सर्वच नागरिकांनी प्रश्न विचारात अनेक अधिकार्‍यांची बोलती बंद केली. यावेळी आमसभा ही खर्‍या अर्थाने सर्व सामान्यलोकांची सभा ठरल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी प्रत्येक विभागाच्या विषयांवर आमदार सुनिल भुसारा यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयांवर सुरू झालेली आमसभा रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहिली. म्हणजेच तब्बल ९ तास ही आमसभा चालली.यावेळी तालुक्यातील रस्ते खोदल्याच्या विषयावर ही सभा गाजली. यावेळी सदरचे रस्ते पूर्वरत करून देण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले.तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत केलेल्या सर्व कामांच्या याद्या सर्व सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश यावेळी आमदार भुसारा यांनी दिले.यानंतर विभागवार झालेल्या चर्चेत तालुक्यातील कोलद्याचा पाडा याठिकाणी अद्याप वीज पोहचली नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासंबंधी कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी वनविभागाकडून आसे भागात मागील चार वर्षात एकही काम केले नसल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी वनविभागाचे अधिकारी निरुत्तर झाले .

शिक्षण विभागाचा विषय निघाला असता शिक्षक वेळा पाळत नाहीत असे नागरिकांनी सांगितले.याशिवाय पाणीपुरवठा विभागाकडून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत आहे. मात्र चास, गोमघर, काष्टी सावर्डे आणि धामणशेत येथील मागीलच योजना अपूर्ण असून त्या अद्याप ग्रामपंचायतीने ताब्यात घेतलेल्या नाहीत. यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेण्यात आला.याशिवाय लघुपाटबंधारे विभागाच्या कामांचा कार्यारंभ आदेश होवूनही २ वर्ष होवूनही कामे न केल्याने संबंधित एजन्सीना काळ्या यादीत टाकण्याच्या सुचना केल्या. यावेळी आमसभेचे अध्यक्ष आमदार सुनिलभाऊ भुसारा, जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री ) प्रकाश निकम, नगराध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य हबीबभाई शेख, जिल्हा परिसद सदस्य कुसुम झोले, उपनगराध्यक्ष नवसू दिघा, सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, मोखाड्यातील सर्व विभाचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील सर्वच गावचे महिला आणि पुरुष उपस्थित होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -