Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरग्रामविकास अधिकार्‍यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य यांची तक्रार

ग्रामविकास अधिकार्‍यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य यांची तक्रार

Subscribe

विकास कामे व साहित्य खरेदी बाबत फक्त तोंडी सांगून ठराव लिहून घेतात व कुठल्याही प्रकारचे दरपत्रक न मागवता परस्पर साहित्य खरेदी करतात अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

डहाणू:  डहाणू तालुक्यातील वाणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत सरपंच आणि सदस्यांनी त्यांची त्वरीत बदली करण्यासाठी जिल्हा परीषदेकडे तक्रार दाखल केली आहे. वाणगाव ही डहाणू तालुक्यातील एक मोठी व प्रमुख ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी पंकज संखे हे सरपंच सुनीता भावर व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून ग्रामविकास अधिकारी हे विकास कामे व साहित्य खरेदी बाबत फक्त तोंडी सांगून ठराव लिहून घेतात व कुठल्याही प्रकारचे दरपत्रक न मागवता परस्पर साहित्य खरेदी करतात अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

ग्रामविकास अधिकारी संखे यांनी १५ व्या वित्त आयोग निधीतून दरपत्रक न मागवता बाजारात उपलब्ध किंमतीपेक्षा अधिक किंमतीचे पाच टीव्ही संच खरेदी करून निधीचा गैरवापर केला असून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील खांबावर लावण्यात आलेल्या तिरंगा एलईडी विद्युत दिवे देखील जास्त रक्कम देऊन खरेदी करण्यात आल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. ग्रामविकास अधिकारी हे मनमानी कारभार करीत असून ना हरकत दाखला देण्यासाठी अडवणूक करणे, विकास कामांची देयके सादर करून धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी दडपण आणत असल्याचे सरपंच यांनी आरोप केला असून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी पालघर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया

ग्रामपंचायत सरपंच सदस्याकडून आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून त्याची योग्य चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

– भानुदास पालवे
मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

कोट
माझ्याविरोधात वाणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य यांनी केलेल्या तक्रार अर्जातील आरोप हे खोटे असून ते गैरसमजुतीने केले असण्याची शक्यता आहे.
– पंकज संखे
ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वाणगाव

कोट
ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी पंकज संखे हे सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून त्यांच्या विरोधात आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
– सुनीता भावर , वाणगाव सरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -