घरपालघरकाँग्रेसचे महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

काँग्रेसचे महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

Subscribe

त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते, याकडे आंदोलनकर्त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

वसईः विविध मागण्यांसाठी वसई काँग्रेसच्यावतीने महापालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. येत्या दहा दिवसांत कामांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांनी यावेळी दिला. आदिवासी समाजाची घरे आणि वस्ती मागील पन्नास-साठवर्षांपासून तेथे आहेत. आजतागायत त्यांच्या घरांना घरपट्टी लागलेली नाही. या घरांना घरपट्टी लावावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्या वस्तीजवळील रस्ते आणि त्याआदिवासी लोकांना पाण्याचे कनेक्शन अजून मिळालेले नाही. त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते, याकडे आंदोलनकर्त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

जिओ आणि गुजरात गॅस कंपनीसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. खोदलेले रस्ते बुजवून ते दुरुस्त केले जावेत,अशी मागणी करण्यात येत आहे. खुल्या गटारांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका आहे. पथदिव्यांची कमतरता आहे. या आणि इतर मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामागण्यांसाठी सकाळी साडे अकरा वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले. तेथे रात्री साडेदहा वाजता स्थगित ठेवण्यात आले. महापालिकेचे अभियंते सुरेंद्र ठाकरे व प्रकाश साटम यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. नंतर कार्यपूर्ती करण्याचे लेखी आश्वासन दिले. येत्या १० दिवसात कामांची पाहणी, पडताळणी व पूर्तता होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणचे नवीन टेंडर निघालेले असून काही ठिकाणी नवीन कामांची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले. ज्यांची वर्क ऑर्डर निघाली आहे. त्याठिकाणी तातडीने कामे सुरू करण्यात येणार आहेत. पालिका अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास येणार्‍या १० दिवसानंतर स्थगित ठेवलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा प्रविणा चौधरी, वॅलेंटाईन मिरची, युवा जिल्हाध्यक्ष निखिल उपाध्याय, शैलेश तोडणकर, वसई शहर ब्लॉक अध्यक्षा बिना फुर्ट्याडो, जिल्हा उपाध्यक्ष बबन लोपीस आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -