घरपालघरबांधकाम विभागातील कर्मचारी एप्रिलच्या पगारापासून वंचित

बांधकाम विभागातील कर्मचारी एप्रिलच्या पगारापासून वंचित

Subscribe

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी एप्रिलच्या पगारापासून वंचित असून त्यामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी एप्रिलच्या पगारापासून वंचित असून त्यामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: ईद सणा अगोदर कर्मचार्‍यांचे पगार अदा करण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्यापही पगार न झाल्याने उसनवारी करण्याची वेळ कर्मचार्‍यांवर आली आहे. महिन्याच्या एक ते दोन तारखेला पगार देण्याचा नियम असतानाही बांधकाम विभागातील कर्मचा-यांचे पगार हे कधीच वेळेवर होत नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. नेहमीच पगाराला उशीर होत असल्याने कर्मचार्‍यांना आपला दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यांचे गणित बसवताना तारेवरची कसरत करावी लागते. उगाचच व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. केलेल्या उसणवारीमुळे कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

आमच्याकडून पगाराची बिले वेळेवर जिल्हा परिषदेकडे गेली आहेत. मात्र अद्यापपर्यंत एप्रिलचा पगार झालेला नाही.
– अंकुश निमजे, उपअभियंता, बांधकाम विभाग पंचायत समिती, वाडा

- Advertisement -

दरमहा एक तारखेला कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्याचे आदेश आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून कधीच एक तारखेला पगार होत नाही, तो पंधरा ते वीस तारखेलाच होतो. उशीरा पगारामुळे कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी होते. म्हणून पगार वेळेवर करावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

हेही वाचा – 

राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -