विक्रमगड तालुक्यात दादडे येथील आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना कोरोना

दादडे येथील एका आश्रम शाळेत १३ विद्यार्थी व ३ कर्मचारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबालकर यांनी दिली.

omicron pune

विक्रमगड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दादडे येथील एका आश्रम शाळेत १३ विद्यार्थी व ३ कर्मचारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबालकर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेले १३ विध्यार्थी ९ वी, १० वी, ११ वी, १२ वी वर्गातील असून १४ ते १८ वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत. या सर्वांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. वैद्यकीय डॉक्टरांची टीम देखरेखीसाठी तैनात करण्यात आली आहे. या सर्वावर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दादडे येथील आश्रम शाळेतील ३६४ विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी १३ विध्यार्थी व ३ कर्मचारी, असे एकूण १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून, या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. या सर्वांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
– डॉ. संदीप निंबालकर, तालुका आरोग्य अधिकारी, विक्रमगड

या दादडे आश्रम शाळेतील एकूण ३६४ विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी या १३ विद्यार्थी व ३ कर्मचारी, असे एकूण १६ जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षण आहेत. तर अनेकांमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्व जण घरीच विलगीकरणात असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. विक्रमगड येथील एका नामंकित शाळेत ४६ विद्यार्थी व ८ कर्मचारी, असे एकूण ५४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती. असे असताना तालुक्यातील दादडे येथील आश्रमशाळेत १३ विद्यार्थी पॉझिटिव्ह मिळाल्याने आरोग्य प्रशासन हादरले असून तालुका आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. कोरोना संसर्ग अधिक होऊ नये, म्हणून प्रशान सतर्क झाले आहे.

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित होऊ लागल्याने पालकांची व नागरिकांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने सर्वांनी अधिक काळजी आणि सतर्क रहावे. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – 

कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी