घरपालघरबांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या कामात भ्रष्टाचार?

बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या कामात भ्रष्टाचार?

Subscribe

ज्यामध्ये हेच बांधकाम अधिकारी बसणार आहेत. तरी सुध्दा या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे

ज्ञानेश्वर पालवे: मोखाड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून चक्क बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी ठेकेदाराकडून माती मिश्रीत रेती आणि दुकानात विक्रीसाठी परवानगी नसलेले सिमेंट वापरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरी देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे चक्क बांधकाम कार्यालयाला लागूनच नवीन इमारतीचे हे बांधकाम सुरु आहे. ज्यामध्ये हेच बांधकाम अधिकारी बसणार आहेत. तरी सुध्दा या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे

निकृष्ट दर्जाची कामे करुन मालामाल होत असलेल्या ठेकेदारांना बोगस काम करण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आणि उप अभियंता देखील तितकेच जबाबदार आहेत,असे आरोप होत आहेत. मोखाड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाची जुनी कार्यालयीन इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु,हे काम सुरू केल्यानंतर अधिकारीच ठेकेदाराला बोगस काम करण्यासाठी परवानगी देत तर नाहीत ना? की ठेकेदारावर कोण्या बड्या राजकीय पुढार्‍यांचा वरदहस्त आहे, म्हणून राजरोसपणे इमारतीच्या बांधकामासाठी दर्जाहीन मटेरियल वापरले जात आहे,असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे. यामुळे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरुन बोगस कामे करीत लाखो रुपये आपल्या पदरी पाडणार्‍या अशा ठेकेदारावर बांधकाम विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -