फॅमिली केअर रुग्णालयावर गुन्हा; कोरोना काळात आर्थिक लुट केल्याचा आरोप

कोरोना रुग्णाला उपचाराच्या नावाखाली बनावट प्रिस्क्रीपन तयार करून मेडिकल चालकाच्या संगनमताने रेमडिसीव्हरसह इतर औषधांच्या नावाखाली आर्थिक लूट केल्याप्रकरणी मीरा भाईंदरमधील फॅमिली केअर रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Family Care Hospital
फॅमिली केअर रुग्णालय

कोरोना रुग्णाला उपचाराच्या नावाखाली बनावट प्रिस्क्रीपन तयार करून मेडिकल चालकाच्या संगनमताने रेमडिसीव्हरसह इतर औषधांच्या नावाखाली आर्थिक लूट केल्याप्रकरणी मीरा भाईंदरमधील फॅमिली केअर रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मेडिकल चालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शाहीन खान यांचे पती लियाकत अली खान (वय ४७) वर्ष यांना १९ ऑगस्ट २०२० रोजी कोविड संसर्ग झाल्याने मिरा रोड येथील फॅमिली केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ५ नोव्हेंबरपर्यंत उपचार करण्यात आले होते. त्याच कालावधीत त्यांचे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे मेडिक्लेम असल्याने संबधित कागदपत्रेही रुग्णालयात जमा करण्यात आली होती.

रुग्णावर डॉ. अजित आव्हाड हे उपचार करत होते. त्यांनी कोविडमुळे प्रकृत्ती खालावल्याचे सांगत एकूण नऊ रेमडिसीव्हर इंजेक्शन मागवून घेतली होती. त्याचे रोख पैसे रुग्णालयातीलच मेडिकल दुकानदाराला द्यावे लागले होते. असे असताना दोन दिवसांनी मेडिकल दुकानातून इंजेक्शनचे पैसे मागण्यात आले. त्याची माहिती घेतली असता डॉ. दिलीप पटेल यांच्या प्रिस्क्रीप्शनवर इंजेक्शन नेल्याचे सांगण्यात आले होते. इतकेच नाही तर डॉ. पटेल यांनी रुग्ण अतिगंभीर असून त्याला Tocilizumah 401, ilzimab 25mp 6 अशी २ इंजेक्शन आणण्याचा आग्रह धरला. त्यानुसार इंजेक्शन आणून दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात रुग्णाला इतकी इंजेक्शन लागली नसल्याची माहिती मिळाल्यावरून तक्रारदार शाहिन खान यांनी तक्रार दिल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक, डॉ. दिलीप पटेल, मेडिकल दुकानाचे व्यवस्थापक त्रिवेणी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – 

Russia Ukraine War: ३६ देशांच्या फ्लाईट्स रशियाकडून बॅन, युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार