घरपालघरभाजपच्या उपसरपंचासह सात जणांवर गुन्हे

भाजपच्या उपसरपंचासह सात जणांवर गुन्हे

Subscribe

हा वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.या हाणामारीत दोन्ही गटांतील पुरुषांसह महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे .मारहाणीच्या घटनेनंतर डहाणू पोलिस स्टेशन येथे प्रकरण आपापसात मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

डहाणूः पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोचल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यातील नवनाथ कोहराळीपाडा या आदिवासी पाड्यात घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने २० जणाविरोधात डहाणू पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भाजपच्या उपसरपंचाही समावेश आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गंजाड-नवनाथ अंतर्गत कोहराळी पाडा येथे ६ मार्चला बोअरवेलमध्ये पाण्याची मोटर टाकण्यावरून दोन कुटुंबामध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.या हाणामारीत दोन्ही गटांतील पुरुषांसह महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे .मारहाणीच्या घटनेनंतर डहाणू पोलिस स्टेशन येथे प्रकरण आपापसात मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, या मारहाणीचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल होताच व त्यामध्ये महिलांनासुद्धा मारहाणीचे दृश्य प्रसिद्ध होताच पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे डहाणू पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. कोहराळी पाडा येथील पाणी प्रश्न गंजाड-नवनाथ ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला असता ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बोअरवेलमध्ये कोणीही खाजगी मोटार टाकू नये असा निर्णय झाला होता. मात्र तरी देखील एका कुटुंबाने बोअरवेलमध्ये मोटर टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाद विकोपाला गेला. आम्ही समजूत काढण्यास गेलो असता पूर्व वैमनस्यातून आम्हाला ही मारहाण झाल्याचा आरोप उपसरपंच कौशल कामडी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -