घरपालघरसंत जोजेफ पतसंस्थेच्या चेअरमनविरोधात गुन्हा; फिर्यादी चेअरमनच आरोपी

संत जोजेफ पतसंस्थेच्या चेअरमनविरोधात गुन्हा; फिर्यादी चेअरमनच आरोपी

Subscribe

थकीत कर्जप्रकरणात गहाण असलेल्या जमिनीवरील बोजा कमी करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील संत जोजेफ क्रेडीट सोसायटीच्या चेअरमन, जनरल मॅनेजरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थकीत कर्जप्रकरणात गहाण असलेल्या जमिनीवरील बोजा कमी करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील संत जोजेफ क्रेडीट सोसायटीच्या चेअरमन, जनरल मॅनेजरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कोट्यावधी गहाण कर्जप्रकरणी संस्थेकडे गहाण असलेली जमीन मिळकत कर्जदाराची परस्पर संगणमत करून खोटे दस्तावेज बनवून संस्थेचे कर्ज येणे बाकी असताना संस्थेच्या नावे असलेला ७/१२ वरील बोजा कमी करून त्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी संस्थेचे जागृत सभासद लिनस डिकुना व रॉकी गोन्साल्वीस यांनी विभागीय सहनिबंधक कोकण भवन येथे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने चौकशी सुरू होऊन २९ जुलै २०१७ रोजी कर्जदार व बँकेचे अध्यक्ष व्हॅलिरियन गोन्साल्विस व तत्कालीन जनरल मॅनेजर पीटर फर्नांडिस यांच्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश प्राप्त झाले होते. याप्रकरणी व्हॅलिरियन गोन्साल्वीस आणि फर्नांडीस यांनी सहकार मंत्र्यांकडे अपिल केले होते. त्यावर मंत्र्यांनी सहनिबंधकांच्या आदेशाला ३ मे २०१८ रोजी स्थगिती दिली होती.

याप्रकरणी पुन्हा सहनिबंधकांकडे सुनावणी पार पडली. त्यात डिकुना यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून आपली बाजू मांडली होती. तेव्हा हे प्रकरण अंगाशी येईल, याची जाणिव झालेल्या चेअरमन गोन्साल्विस यांनी पतसंस्थेमार्फत कर्जदाराविरोधात वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी व्हॅलिरियन गोन्सालवीस यांना फिर्यादी बनवून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदाराविरोधात गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

गोन्सालवीस प्रकरणाला बगल देत असल्याने डिकुना आणि गोन्साल्विस यांनी सतत पाठपुरावा करून याप्रकरणी कर्जदार, चेअरमन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचे पुरावे सादर केले होते. त्याची दखल घेत सहनिबंधकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. संस्थेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या चेअरमन यांच्यासह संचालक, अधिकारी यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. संस्थेचे पूर्वीचे वैभव मिळवून देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण करणार, असे डिकुना यांनी सांगितले.

हेही वाचा –

Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य

संत जोजेफ पतसंस्थेच्या चेअरमनविरोधात गुन्हा; फिर्यादी चेअरमनच आरोपी
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -