घरपालघरचक्रीवादळाचा मीठ उत्पादकांना फटका; लाखो रुपयांचे मीठ पाण्यात

चक्रीवादळाचा मीठ उत्पादकांना फटका; लाखो रुपयांचे मीठ पाण्यात

Subscribe

मागील दोन दिवसांपासून पालघर तालुक्यात आलेल्या चक्रीवादळाने मीठ व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळात सुमारे १ हजार किलोच्या आसपास मीठ वाहून गेल्याने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मीठ उत्पादकांकडून केली जात आहे.

मागील दोन दिवसांपासून पालघर तालुक्यात आलेल्या चक्रीवादळाने मीठ व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळात सुमारे १ हजार किलोच्या आसपास मीठ वाहून गेल्याने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मीठ उत्पादकांकडून केली जात आहे. तालुक्यातील सफाळे-केळवे परिसरात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने मीठ उत्पादन केले जाते. निर्माण केलेले मीठ मार्च, एप्रिल आणि मेमध्ये विक्रीला काढले जाते. मात्र कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि त्यापाठोपाठ आलेले चक्रीवादळ यामुळे या व्यवसायाची पूर्णपणे वाताहत झाली असून खर्च केलेला पैसा सुद्धा वसूल होणार नाही असे मीठ उत्पादकांचे म्हणणे आहे. परिसरात संजीवनी मिठागर, सर्वोदय मिठागर, केळवे सॉल्ट, महावीर सॉल्ट, महालक्ष्मी सॉल्ट इतर काही खाजगी मिठागरे असून संजीवनी मिठागर सर्वात मोठा मिठागर असून त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. इतर मिठागराचे प्रत्येकी किमान ५०० ते १००० टन मिठाचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन झाले होते मात्र, चक्रीवादळामुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले. अशा परिस्थितीत कामगारववर्गाचा पगार देणे कठिण झाले आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानाची तत्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
– दत्तात्रेय भोईर, सचिव सर्वोदय मीठ उत्पादक सोसायटी

- Advertisement -

सर्वोदय मीठ उत्पादक सहकारी सोसायटी मायखोप संस्थेच्या मिठागराचे मोठे नुकसान झाले आहे. मिठागराच्या प्लॅटफॉर्मवरील सुमारे १०० टनाहून अधिक मीठ वाहून गेले. तर अवेळी झालेल्या पावसाने मीठ उत्पादनाचा महत्वाचा पुढील २० दिवसांचा कालावधीही संपुष्टात आला आहे. उत्पादित मिठाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार देणे ही शक्य होणार नाही. त्यामुळे वादळामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्वोदय मीठ उत्पादक सोसायटीचे सचिव दत्तात्रय भोईर यांनी केली आहे.

मिठागरात ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत मीठ उत्पादनाची प्रक्रिया चालते. मार्च अखेरपासून ते जूनचा पहिला आठवड्यापर्यंत प्रत्यक्षात मीठ बाहेर निघते. एप्रिल व मे महिन्यात विक्री होते. लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे एप्रिल महिन्यामध्ये मीठ विक्री खूप कमी प्रमाणात झाली. मे महिन्यामध्ये मीठ विक्री चालू असतानाच पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने मिठागरात अजून मिठाच्या राशी शिवल्या नसल्याने साठवलेले मीठ वाहून गेले.

- Advertisement -

वसईतील मीठागरेही पाण्यात

अवकाळी पाऊस आणि कोरोनाचे संकट यामुळे फक्त ३० ते ४० टक्केच मीठ उत्पादन झाल्याने मागच्यावर्षी मीठ उत्पादकांना आर्थिक फटका बसला होता. त्यातच अवकाळीमुळे यंदा मीठाचा हंगाम उशिराने सुरु करण्यात आला होता. पण, सोमवारी आलेल्या चक्रीवादळामुळे मीठ वाहून गेल्याने वसईतील मीठ उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे. वसई तालुक्यात जुचंद्र, उमेळमान, उमेळा, राजावली, नवघर पूर्व, पाणजू या परिसरात मिठागरे आहेत. पण, चक्रीवादळाने लाखो रुपयांचे मीठ वाहून गेले आहेत.

हेही वाचा –

शहापुरात कारसह मोटारसायकल आगीत खाक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -