डहाणू : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज डहाणूतील ग्राममंगल शाळेला भेट देऊन तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीची पाहणी केली. यावेळी मंत्री भुसे यांनी शाळेतील शिक्षक, ग्रामशिक्षण समिती आणि तज्ञांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी शाळेच्या चांगल्या उपक्रमांचा अभ्यास करून त्याचा उपयोग करण्याचा संकल्प व्यक्त केला. मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील गरीब व वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणातील आव्हाने ओळखून त्या दुरुस्ती करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याचा उपयोग केला जाईल. तसेच त्यांनी राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. ऊसतोड मजूर व स्थलांतरित कुटुंबांतील मुलांसाठी विशेष योजना आखण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शाळा दुरुस्ती आणि अन्य कामकाजात गैरव्यवहाराच्या संदर्भात बोलताना भुसे म्हणाले, गैरव्यवहार करणार्यांवर योग्य ती चौकशी केली जाईल, तसेच संबंधित अधिकार्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील.
Dada Bhuse: डहाणूतील ग्राममंगल शाळेला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट
written By My Mahanagar Team
dahanu