HomeपालघरDahanu Accident: टँकरची कंटेनरला जोरदार धडक

Dahanu Accident: टँकरची कंटेनरला जोरदार धडक

Subscribe

या अपघातामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडले, तर कंटेनरमधील सिमेंटचे पाईप रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

डहाणू: सोमवार, ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर केमिकलने भरलेल्या टँकरने पाईप घेऊन जाणार्‍या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडले, तर कंटेनरमधील सिमेंटचे पाईप रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

अपघातानंतर सुमारे ३० मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. चालकाचा पाय स्टिअरिंगमध्ये अडकल्यामुळे त्याला गाडीतून बाहेर काढणे कठीण झाले. अखेर क्रेनच्या मदतीने वाहनाचा पुढील भाग खेचून ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिकांनी चालकाला बाहेर काढले.


Edited By Roshan Chinchwalkar