HomeपालघरDahanu Accident: टँकरची दोन तरुण दुचाकीस्वारांना धडक,एक ठार, एक गंभीर

Dahanu Accident: टँकरची दोन तरुण दुचाकीस्वारांना धडक,एक ठार, एक गंभीर

Subscribe

या भागात भूसंपादन मोबदल्यावरून यापूर्वीच मोठा वाद चिघळला होता. सुरक्षेच्या अभावामुळे स्थानिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.

डहाणू : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी डिझेल पुरवणार्‍या रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कोचाई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वडीपाडा परिसरात शनिवारी दुपारी १:३० वाजता हा अपघात झाला. महेश दशरथ सालकर (वय 19) याचा जागीच मृत्यू झाला असून, अरुण शैलेश वरठा गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.महेश आणि अरुण हे मोटारसायकलने घरी जात असताना, टँकरने त्यांना धडक दिली. धडकेमुळे महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अरुणला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी काम बंद पाडत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी टँकर चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले.ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासन यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला, तर पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पंचनामा सुरू केला. स्थानिकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात आला. या भागात भूसंपादन मोबदल्यावरून यापूर्वीच मोठा वाद चिघळला होता. सुरक्षेच्या अभावामुळे स्थानिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.

 

- Advertisement -

“महामार्गाच्या कामात वापरणार्‍या वाहनांची बेशिस्त आणि सुरक्षेच्या अभावामुळे हा अपघात घडला आहे. शासनाने नुकसानभरपाई देऊन तातडीने कारवाई करावी.”
– जितेश सालकर, मृताचे नातेवाईक.

“घटनास्थळी पोलीस यंत्रणा तत्काळ पोहोचली होती. ग्रामस्थांनी केलेले आरोप अयोग्य आहेत. आम्ही कर्तव्यदक्षपणे काम केले.”
– विजय मुतडक, पोलिस निरीक्षक, तलासरी.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -