घरपालघरभूकंपाच्या धक्क्याने डहाणू व तलासरी तालुके हादरले

भूकंपाच्या धक्क्याने डहाणू व तलासरी तालुके हादरले

Subscribe

पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी वस्ती असलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात २०१९ पासून भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सतत सुरु आहे.

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली भूकंपाच्या धक्क्यांची मालिका अजूनही सुरूच आहे.सोमवारी (आज) दुपारी १२.५३ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने घोलवड,उंबरगाव,झाई,कोसबाड,चिखला,नरपड,आशागड,आंबेसरी,धुंदलवाडी हा परिसर हादरला.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ इतकी नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी वस्ती असलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात २०१९ पासून भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सतत सुरु आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बोर्डी परिसरात बसलेल्या ४ रिस्टर स्केलच्या धक्क्यानंतर भूकंपाची मालिका वर्षभर थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.मात्र आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने परिसर हादरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील आंबेसरी परिसरात जमिनीखाली ५ कीमी खोलीवर नोंदविला गेला असून भूकंपाची तीव्रता ३ इतकी रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे.या भूकंपामुळे परिसरात कुठल्याही प्रकारची जिवीत आणि वित्तहानीची नोंद झालेली नाही.मात्र तीव्र धक्क्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पळाले.
२०१९ पासून डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी आणि आंबेसरी या भागात भूकंपाच्या सतत बसणार्‍या धक्क्यांनी सरकार आणि पालघर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर या गावातील नागरिकांची शाळा आणि तंबूमध्ये राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली होती.मागील एक वर्षापासून भूकंपाचे धक्के थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -