घर पालघर दमण- सिल्वासा बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई

दमण- सिल्वासा बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई

Subscribe

त्यानंतर काही वेळाने उधवा- करजगाव रस्त्यावर दुसर्‍या संशयित इको कारची तपासणी केली असता कारमध्ये दमण- सिल्वासा बनावटीचा दारूचा साठा आढळून आला.

मनोर: उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील उधवा -करजगाव रस्त्यावर सापळा रचून केलेल्या कारवाईत दारूच्या साठ्यासह दोन कार जप्त केल्या आहेत.केंद्र शासित प्रदेशातून होणारी दारू तस्करी रोखण्यासाठी उद्देशाने उधवा- करजगाव रस्त्यावर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास लावलेल्या नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक संशयित इको कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेले दमण सिल्वासा बनावटीचे विदेशी मद्य आणि बिअरचा साठा आढळून आला.कार चालक नरेश सुरेश वळवी (वय.24) याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्यानंतर काही वेळाने उधवा- करजगाव रस्त्यावर दुसर्‍या संशयित इको कारची तपासणी केली असता कारमध्ये दमण- सिल्वासा बनावटीचा दारूचा साठा आढळून आला.

कार चालक विजय हरजी राजड (वय.33) याला ताब्यात घेण्यात आले आहे.दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दमण-सिल्वासा बनावटीचे विदेशी मद्य आणि बीअरचे 49 बॉक्स तसेच विदेशी मद्य 43 बल्क लिटर तर 306 बल्क लिटर बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम,उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकातील अधिकारी व जवानांनी केली आहे.कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या दापचरी सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक आणि कर्मचार्‍यांना मदत केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -