घरपालघरमोखाडा ग्रामीण रुग्णालयात मेणबत्ती पेटवून प्रसुती, उपचार

मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मेणबत्ती पेटवून प्रसुती, उपचार

Subscribe

वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मेणबत्ती आणि मोबाईलमधील बॅटरीच्या उजेडात महिलांची चक्क प्रसुती करत आहेत.

वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मेणबत्ती आणि मोबाईलमधील बॅटरीच्या उजेडात महिलांची चक्क प्रसुती करत आहेत. तसेच रुग्णावरही उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मोखाडा तालुक्यात डेंग्यु, चिकणगुण्या, मलेरिया, न्युमोनिया आणि टायफाईडचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सर्व रूग्ण उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, रूग्णालयातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे रूग्णांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आठवडा भरापासून येथील वैद्यकीय अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून रूग्णांवर उपचार करत आहे. प्रसुतीगृहातही मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून महिलांची प्रसुती प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत. तर जनरेटरचा फॅन नादुरुस्त आहे, असे उत्तर मिळाले. रूग्णालयात अंधारात मेणबत्ती आणि मोबाईलची लाईट लावून उपचार करावे लागत आहेत. एका सामाजिक संस्थेने इन्व्हर्टर दिला आहे. तो लवकरच बसवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
– प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य

- Advertisement -

मोखाडा तालुक्यातील ९० हजार नागरिकांचे आरोग्य अवलंबून असलेल्या ग्रामीण रूग्णालयाला गैरसुविधांनी घेरले आहे. तालुक्यात डेंग्यु, चिकणगुण्या, न्युमोनिया आणि मलेरियाचे रूग्ण आढळत आहेत. त्याचा सर्व भार ग्रामीण रूग्णालयावर येत आहे. रूग्ण संख्या वाढल्याने, खाटा भरल्या आहेत. रूग्णांना जमिनीवर खाली गादी टाकून उपचार दिले जात आहे. येथे विजेचा कायम लपंडाव सुरू असतो. रूग्णालयात इन्वर्टर आणि जनरेटरची सुविधा असताना, त्याचा वापर न करता चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तर प्रसुतीगृहात ही मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून महिलांची प्रसुती प्रक्रिया केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिला आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आठवडाभरापासून सुरू आहे.

सेनेच्या दणक्याने जनरेटर सुरू

शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी व आपल्या मुलीच्या उपचासाठी रूग्णालयात गेले असता हा प्रकार समोर आला. मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून रूग्णांना इंजेक्शन दिले जात होते. तर प्रसुतीगृहातही हाच गंभीर प्रकार दिसल्याने, निकम यांनी तातडीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश पाटील यांना दूरध्वनी करून धारेवर धरले. प्रत्येकवेळी आंदोलन केलेच पाहीजे का?, जाब विचारल्यावरच रूग्णांना सुविधा देणार का?, असे खडे बोल सुनावले. सरकार येथे सुविधा पुरवत असताना त्याचा उपयोग का केला जात नाही. असा सवाल ही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर अर्धा तासात रूग्णालयातील जनरेटर सुरू करण्यात आले. त्यामुळे गर्भवती महिला, रूग्ण आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

(ज्ञानेश्वर पालवे – हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा केला व्हाईट, किरीट सोमय्यांचा नवा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -