घरपालघरपशुधन पर्यवेक्षक पदांच्या पद संख्येत वाढ करण्याची मागणी

पशुधन पर्यवेक्षक पदांच्या पद संख्येत वाढ करण्याची मागणी

Subscribe

त्यानुसार, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 26 मे 2023 रोजी पशुधन पर्यवेक्षक गट-क नियुक्तीकरिता 376 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

वाडा:राज्यातील पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्या संदर्भात 26 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक 376 पदांचे अर्ज मागवून आयबीपीएस या खासगी कंपनीकडून 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पशुधन विभागात पदोन्नती, सेवानिवृत्तीमुळे पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्तपदांची संख्या वाढणार आहे. त्याची दखल घेत पशुधन पर्यवेक्षक पदाच्या भरती संख्येत वाढ करावी, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदवी /पदविकाधारक संघर्ष समितीने राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पशुसंवर्धन मंत्री, पशुसंवर्धन आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आली आहे. त्यानुसार, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 26 मे 2023 रोजी पशुधन पर्यवेक्षक गट-क नियुक्तीकरिता 376 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

तब्बल आठ वर्षांनंतर ही जाहिरात आल्याने याला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत 22 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर 9 सप्टेंबर 2023 मध्ये पशुधन पर्यवेक्षकांकरिता दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात 128 पशुधन पर्यवेक्षकांची सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावर पदोन्नती होणार आहे. त्यासोबतच डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पशुधन पर्यवेक्षक सेवानिवृत्त होतील. त्याची दखल घेत भरती प्रक्रियेत 128 पदांची वाढ करावी, अशी मागणी आहे. भरती प्रक्रिया यंदाच व याच जाहिराती मध्ये राबवावी, अशी देखील मागणी कोकण विभाग कृषि पदवी /पदविकाधारक संघर्ष समितीने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -