घरपालघरविकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे वाढीव निधीची मागणी

विकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे वाढीव निधीची मागणी

Subscribe

जिल्हा परिषद पालघरमधील जिल्हा परिषद शिक्षक ६०% पेक्षा कमी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत निवेदन ही यावेळी देण्यात आले.

नदीम शेख,पालघर :  सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२३-२४ चा आराखडा अंतिम करणे बाबतची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडून जिल्हयातील विकासकामांसाठी वाढीव निधी मिळावा यासाठी मागणी करण्यात आली. पालघर जिल्ह्याला भेडसावणार्‍या प्रामुख्याने आरोग्य व कुपोषणाच्या प्रश्नांकडे अध्यक्षांनी लक्ष वेधले. यामध्ये जव्हार उपजिल्हा रुग्णालय येथे दोनशे खाटांचे रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असल्याबाबत व मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांचे रुग्णालयाचे काम प्रलंबित असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषद पालघरमधील जिल्हा परिषद शिक्षक ६०% पेक्षा कमी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत निवेदन ही यावेळी देण्यात आले.

पालघर जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी काम करणारे कर्मचार्‍यांचा एक स्तर कमी झाल्यामुळे बहुतांश कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी काम करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे त्यांचा एकस्तर पुन्हा सुरू करण्यात येण्या बाबतची मागणी अध्यक्ष निकम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या इमारती प्रशस्त असल्यामुळे त्यांच्या दुरुस्ती देखभाल व अंतर्गत व्यवस्थापनचा खर्च अतिशय जास्त असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली असून याची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी सदर विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. याव्यतिरिक्त जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध विभागातील एकूण ८३ कोटींच्या अतिरिक्त मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना देण्यात आले. या बैठकीसाठी पालघर जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार, विभागीय आयुक्त, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पालघर जिल्ह्यातील विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -