घरपालघरपिंपळशेत ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

पिंपळशेत ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Subscribe

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत ग्रामपंचायतीमध्ये विविध कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्याकडे सोमवारी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत ग्रामपंचायतीमध्ये विविध कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्याकडे सोमवारी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेनेचे माजी जिप सदस्य श्रावण खरपडे यांनी यावेळी दिला. जव्हार तालुक्यातील पिंपळशेत ही ग्रामपंचायत अतिदुर्गम भागात असल्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामसेवकाने येथील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मनमानी पद्धतीने कारभार करून लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
– समीर वाठारकर, गटविकास अधिकारी, जव्हार

- Advertisement -

२०१६ ते २०२१ या कालावधीत विविध कामे ग्रामपंचायत स्तरावर मंजूर करण्यात आली होती. त्यात कोतीमाळ येथील वळण रस्ता खड्डे भरणे, कोतीमाळ येथील समाज मंदिर दुरुस्ती करणे, पिंपळशेत येथे व्यायाम शाळा बांधणे, पिंपळशेत येथे पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या टाक्या खरेदी करणे, शिंगारपाडा येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, माडविहीरा येथील रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे, शिंगारपाडा येथे मोरी बांधणे, पिंपळशेत ग्रामपंचायतीमधील अंगणवाड्यांना दप्तर व कपडे खरेदी करणे, आरसीसी सिमेंट बेंच खरेदी करणे, कचराकुंड्या खरेदी करणे, अपंगासाठी खुर्च्या खरेदी करणे, गावाअंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवणे, कुपोषित बालकांना आहार वाटप करणे, ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये सोलर लॅम्प बसवणे, सर्व जिल्हा परिषद शाळांना साऊंड सिस्टम पुरवणे, ग्रामपंचायतीमधील सर्व गावपाड्यांना स्ट्रीट लाईट बसवणे, खरोंडा येथील साकाव दुरुस्त करणे, वैयक्तिक शौचालयाचा लाभ देणे अशा विविध कामात भ्रष्टाचार झाला असून, काही कामे थातूरमातूर करण्यात आली आहेत. तर काही कामे न करताच बिले काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अंगणवाडी दप्तर व कपडे खरेदी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकारही उजेडात आला आहे. तसेच हुबरंन येथे एकही शौचालय न बांधता लाभार्थ्यांच्या नावे ग्रामसेवकांनी परस्पर पैसे काढल्याचा प्रकारही चव्हाट्यावर आला आहे. तत्कालीन ग्रामसेवक चंद्रकांत गुहे व सध्याचे ग्रामसेवक भास्कर शिंदे यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, युवासेनेचे रवी लाखन, सुभाष गावित यांच्यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

आरोग्य भरतीत घोटाळा; दलालाच्या Audio Clip मुळे उडाली खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -