घरपालघरभाईंदरमधील 'त्या' तळीरामांवर कडक कारवाईची मागणी

भाईंदरमधील ‘त्या’ तळीरामांवर कडक कारवाईची मागणी

Subscribe

भाईंदर पश्चिम येथील पंडित भिमसेन जोशी रूग्णालयाला येथील काही कर्मचाऱ्यांनी तळीरामांचा अड्डा बनवला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशांत दळवी यांनी केली आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत झालेल्या भाईंदर पश्चिम येथील पंडित भिमसेन जोशी रूग्णालयाला येथील काही कर्मचाऱ्यांनी तळीरामांचा अड्डा बनवला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रूग्णालय महापालिकेकडून महाराष्ट्र शासनास वर्ग करण्यात आलेले आहे. या रूग्णालयात विविध उपचारार्थ सर्वसामान्य नागरिकांची दररोज मोठी वर्दळ सुरू असते. या रूग्णालयात कोविडग्रस्तांवर देखील उपचार केले जात असून यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पंडित भीमसेन जोशी रूग्णालयालगतच शवविच्छेदन गृह असून याकामी एक शवागार बांधण्यात आलेले आहे. या शवविच्छेदनगृहाचा रूग्णालय कर्मचाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी काही कर्मचारी मद्यप्राशन करताना आढळून आले होते. या शवविच्छेनगृहाला येथील कर्मचाऱ्यांनी तळीरामांचा अड्डाच बनवला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसून या रूग्णालयाच्या आवारात असलेले सीसीटीव्ही देखील बंद आहेत. सीसीटीव्ही सुरू करण्याकरता शासनाच्या आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याने राज्य शासन व मिरा-भाईंदर महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. याकडे दळवी यांनी टोपे यांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

याप्रकरणाचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार अनिल नौटीयाल यांच्यावर या कर्मचाऱ्यांनी हल्ला केला असून या संदर्भात नौटीयाल यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस स्टेशनात रूग्णवाहिका चालक सुशांत व इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणूनच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशी मागणी दळवी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा – 

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -