Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर पालघर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची मागणी

भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची मागणी

Subscribe

या आर्धा किलोमीटर अंतरावर पुन्हा विद्युत खांब उभे न करता भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात याव्यात अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

वाडा:  वाडा बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवले गेलेले नाहीत. हे विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला उभे करण्यासाठी अनेक अडचणी येणार असल्याने येथील विद्युत वाहिन्या भुमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पालघर – वाडा -देवगांव हा राज्य महामार्ग वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून गेला आहे. या महामार्गाचे अलिकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रूंदीकरणानंतर येथील विद्युत खांब अजूनपर्यंत हटविले गेले नसल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. या खांबांमुळे अपघात सुद्धा होत आहेत. खंडेश्वरी नाका ते परळी नाका हे बाजारपेठेतील अर्धा किलोमीटर (500 मीटर) आहे. या आर्धा किलोमीटर अंतरावर पुन्हा विद्युत खांब उभे न करता भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात याव्यात अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

खर्च अधिक येणार

- Advertisement -

बाजारपेठेतून गेलेल्या या महामार्गाच्या दुतर्फा विद्युत ग्राहक आहेत. त्यांच्यापर्यंत विद्युत पुरवठा पुरविण्यासाठी दुतर्फा भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा खर्च अधिक आहे. विद्युत खांब हटवून नवीन जागेत उभे करण्याच्या अंदाज पत्रकाला मान्यता मिळाली आहे. हे काम काही दिवसांनीच सुरु होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा, व सहाय्यक अभियंता विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

भूमिगत विद्युत वाहिन्यांवर आताच जास्तीचा केलेला खर्च भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याने या वाहिन्या भुमिगत करण्यासाठी फेरविचार व्हावा.
-प्रभाकर माधव पाटील – सामाजिक कार्यकर्ता, वाडा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -