घरपालघरबीएसयुपी लाभार्थी सुविधांपासून वंचित; गैरसोय, समस्यांनी रहिवाशी त्रस्त

बीएसयुपी लाभार्थी सुविधांपासून वंचित; गैरसोय, समस्यांनी रहिवाशी त्रस्त

Subscribe

मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना शिफ्टिंग दिलेल्या इमारतीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना शिफ्टिंग दिलेल्या इमारतीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. सुविधा पुरवण्याकडे लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा रहिवाशांचा आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील पांडुरंगवाडी येथे एमएमआरडीए इमारतीमध्ये काशीमिरा, जनता नगर येथील बीएसयुपी योजनेच्या लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी घरे देण्यात आली आहेत. या परिसरात लोढा, मन ऑपस, एस. के. हाईट्स इमारती असून या इमारतीमधील विद्युत पुरवठा, लिफ्ट, साफसफाई योग्य प्रकारे होत नाहीत.

या इमारतीची लिफ्ट खराब झाली असून तिचे साहित्य मिळत नसून त्या पार्टसची कंपनीला मागणी केली आहे. ते पार्टस मिळताच लिफ्ट दुरुस्त केली जाईल व तेथील रहिवाशांच्या समस्या सोडवल्या जातील.
– यतीन जाधव, प्रभारी उपअभियंता, मीरा भाईंदर महापालिका

- Advertisement -

इमारत १८ मजल्याची असून गेल्या दीड महिन्यांपासून येथील लोढा इमारतीची लिफ्ट गेल्या अठरा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या वृद्ध नागरिक, महिला यांना १८ मजले चढउतार करणे त्रासदायक ठरत आहे. देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने लिफ्ट बहुतेक वेळा बंदच असते. महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना अनेकवेळा सांगूनही येथील समस्या सोडवल्या जात नाहीत, अशी रहिवाशांची तक्रार आहे. येथील इमारतीची देखभाल दुरुस्ती करणारा ठेकेदार व त्यांचे कर्मचारी रहिवाशांना योग्य माहिती देत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

येथील इमारतींची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून महापालिकेचे अधिकारीही येथील नागरिकांच्या सोयीसुविधाकडे लक्ष देत नसून महापालिका अधिकारी व ठेकेदारांच्या साटेलोटयामुळे गरीब जनतेचे हाल केले जात आहेत, असाही रहिवाशांचा आरोप आहे. येथील समस्या पाहता यापेक्षा पूर्वी आम्ही राहत होतो ती झोपडपट्टी तरी बरी होती, असे रहिवाशी सांगत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील बी.डी.डी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -