Eco friendly bappa Competition
घर पालघर उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंता अडचणीत

उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंता अडचणीत

Subscribe

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र निकिता पांडे यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना दिल्याने महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

वसईः नालासोपाऱ्यातील अठरा अनधिकृत इमारतींवर कारवाई करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त अजित मुठे, सहाय्यक आयुक्त नीता कोरे आणि अभियंता कृतार्थ धानवे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे पत्र अवर सचिव निकीता पांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे तीनही अधिकारी अडचणीत सापडले आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. याविरोधात काही जण न्यायालयातही गेले आहेत. तरीही अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे येथील अनधिकृत बांधकामे होतच आहेत. अधिकाऱ्यांच्या स्वरक्षणात बांधकामे वाढत असल्याच्या तक्रारी मंत्रालयापर्यंत गेल्याने त्याची दखल घेत अवर सचिव निकिता पांडे यांनी  अनधिकृत बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रमुख उपायुक्त अजित मुठे, सहाय्य्क आयुक्त नीता कोरे आणि  अभियंता कृतार्थ धानवे यांच्या विरोधात कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत  त्यांची चौकशी करून त्यांच्यावर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र निकिता पांडे यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना दिल्याने महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महा पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वसई-विरार महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागा आणि शहरात होणाऱ्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार, `अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्ष`ची स्थापना केली होती. या विभागाची प्रमुख जबाबदारी उपायुक्त अजित मुठे यांच्यावर सोपवण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळवण्यासोबतच ही बांधकामे पुन्हा उभी राहू नयेत म्हणून कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया  पार पाडण्याची जबाबदारी उपायुक्त अजित मुठेनऊही प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि त्या त्या विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर होती.प्रत्यक्षात मात्र एचव जीप्रभाग समिती वगळता उपायुक्त अजित मुठे यांची अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई दिसली नाही. एमआरटीपीची नोटीस बजावतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अनेक अतिक्रमणधारकांना वगळले होते. शिवाय न्यायालयीन पातळीवरील कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. याचे परिणाम म्हणून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरूच राहिली. भूमाफियांना महापालिकेचा धाक राहिला नाही. त्यामुळे उपायुक्त अजीत मुठे यांच्याविरोधात अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत दुजाभाव केल्याचे व भूमाफियांकडून पैसे घेतल्याचे आरोप होत राहिले.

- Advertisement -

महापालिका आयुक्त व राज्य सरकारकडे उपायुक्त अजित मुठे आणि टीमविरोधातील या वाढत्या तक्रारींमुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यात आता प्रभाग समिती `मधील १८ इमारतींवर कारवाई न केल्याने उपायुक्त अजित मुठेसहाय्यक आयुक्त नीता कोरे व अभियंता कृतार्थ धानवे यांच्या चौकशीचे निर्देश महाराष्ट्र सरकारच्या अवर सचिव निकिता पांडे  यांनी पत्र दिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -