घरपालघरउघड्या विद्युत मीटर पेटीची दुरवस्था

उघड्या विद्युत मीटर पेटीची दुरवस्था

Subscribe

त्यामुळे यदाकदाचित एखाद्या माणसाला विद्युत शॉक लागून मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.

डहाणू: शहरातील नगर परिषद कार्यालय इमारतीच्या प्रवेश जिन्यालगत असलेल्या विद्युत वाहिनी इलेक्ट्रिक मीटर बॉक्सची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विशेतः याच इमारतीमध्ये दुसर्‍या मजल्यावर डहाणू नगर परिषदेचे कार्यालय असून येथे डहाणू नगर परिषदमधील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी ये जा करत असतात. मात्र या धोकादायक विद्युत वाहिनीच्या बॉक्सची दुरावस्था असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. बॉक्समधील विद्युत वाहिनी तारा या अस्ताव्यस्त तुटलेल्य, लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील इमारतीमध्ये राहणारे नागरिक, तसेच नगर परिषद कार्यालयातील शेकडो नागरिक ये- जा करत असतात. त्यामुळे यदाकदाचित एखाद्या माणसाला विद्युत शॉक लागून मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.

सदर इमारतीला विद्युत पुरवठा करणारी विद्युत पेटी पूर्ण मोडकळीस आली आहे. त्यातील निघणार्‍या विद्युत तारा या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. त्यामुळे यदाकदाचित एखाद्या माणसाला विजेचा शॉक लागून मोठी जीवितहानी होऊ शकते. याकरिता महावितरण विभागाने मोडकळीस आलेली पेटी सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बदलावी.
– वैभव आवारे,मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

- Advertisement -

नगरपरिषद कार्यालयामध्ये आम्हाला अनेक वेळा विविध कामानिमित्त यावे लागते. पण नगरपरिषद कार्यालयाच्या खालीच असलेल्या उघड्या विद्युत पेटीमुळे खरेतर भीती वाटत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना व्हावी.

– उज्वला डामसे, महिला कार्यकर्त्या, शिवसेना उद्धव ठाकरे गट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -