घरपालघरअतिवृष्टीमुळे जीर्ण इमारती कोसळण्याच्या मार्गावर

अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारती कोसळण्याच्या मार्गावर

Subscribe

परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले असून गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा तालुक्यासह शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले असून गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा तालुक्यासह शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या सततच्या तडाख्याने शहरातील जीर्ण इमारती कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी झाली आहे. त्यातच पाऊस अद्याप थांबायचे नाव घेत नाही. सततच्या अतिवृष्टीमुळे वाडा शहरात एक नवा गंभीर प्रश्न समोर आला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शहरातील जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याचे प्रकार समोर येत आहेत. वाड्यात ब्रिटीशकालीन इमारती अजूनही अस्तित्वात आहेत. वाडा तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस वसाहत अशा विविध इमारती अजूनही सुस्थितीत असून त्यांचा वापरही केला जात आहे. मात्र, माती, विटांनी बांधलेल्या ज्यांनी शतक पार केले आहे. त्यापैकी अनेक इमारती अतिशय जीर्ण झाल्या आहेत.

तसेच तिथे कोणाचा सहवास नसल्याने त्या दुरुस्तीविना डबघाईला आल्या आहेत. अनेक वर्षांपासून दुरुस्तीही व डागडुजी केली जात नाही. त्यात अतिवृष्टीमुळे या इमारती हळूहळू ढासळत चालल्या आहेत. वाड्यातील भानुशाली आळी येथील एका इमारतीचा काही भाग बुधवारी सकाळी कोसळल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारतीला लागून रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगावर पडून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

वाड्यातील पाटील आळी, वाणी आळी, सिद्धेश्वर रोड, मुस्लिम आळी अशा अनेक भागात शतक ओलांडलेली घरे आहेत. देखभाल दुरस्ती आणि जीर्ण झाल्यामुळे ही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यासाठी घरे कोसळून दुर्घटना होण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साठल्याने भातपिकांची नासाडी होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. असाच पाऊस आणखी चार, पाच दिवस कोसळत राहिला तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हेही वाचा –

IPL किक्रेट सामन्यावर सट्टा, ठाण्यातून त्रिकुटाला अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -