Eco friendly bappa Competition
घर पालघर गलिच्छपणा ! आदर्श रेल्वे स्थानकाच्या शौचालयाची दुरवस्था

गलिच्छपणा ! आदर्श रेल्वे स्थानकाच्या शौचालयाची दुरवस्था

Subscribe

सफाळे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील शौचालय रेल्वेच्या प्रकल्पादरम्यान तोडण्यात आले. त्यानंतर बर्‍याच महिन्यांनी नवीन शौचालय उभारले. मात्र त्याच्या उद्घाटनाचा योग रेल्वे प्रशासनाला सापडत नाही आहे.

सफाळे: आदर्श रेल्वे स्थानकाचा बहुमान मिळून प्रवाशांकरिता स्थानकातील मूलभूत सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाची सुधारणा करण्यात आली होती. मात्र आज याच स्थानकातील शौचालायची नियमित साफसफाई न केल्याने प्रवाशांना घाणीला सामोरे जावे लागत आहेत.
उपनगरीय स्थानकाचा दर्जा प्राप्त झालेल्या सफाळे स्थानकातून सकाळच्या वेळी मुंबईच्या व गुजरातच्या दिशेने जाणार्‍या व सायंकाळी तेथून येणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्थानकातील दरडोई उत्पन्नातून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होत असतो. मात्र असे असतानाही या स्थानकातील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाची साफसफाई न केल्यामुळे दररोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत. सफाळे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील शौचालय रेल्वेच्या प्रकल्पादरम्यान तोडण्यात आले. त्यानंतर बर्‍याच महिन्यांनी नवीन शौचालय उभारले. मात्र त्याच्या उद्घाटनाचा योग रेल्वे प्रशासनाला सापडत नाही आहे.

तर फलाट क्रमांक १ वर पूर्वीपासूनचे शौचालय उभारलेले असून या शौचालयाची नियमित साफसफाई न केल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन त्याचा वापर करावा लागतो. अशातच महिला प्रवाशांची मात्र भयंकर कुचंबणा होत असतानाही रेल्वे प्रशासन स्वच्छतेच्या दृष्टीने कमकुवत पडत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

 

मी कामानिमित्त दररोज सफाळे स्थानकातून प्रवास करतो. अनेकदा स्थानकातील शौचालयाचा वापर करावा लागतो. मात्र तेथे स्वच्छतेअभावी भयंकर दुर्गंधी निर्माण झाली आहे.तसेच रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी याकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे.
– ज्ञानेश चौधरी, प्रवासी सफाळे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -