घरपालघरआदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप

आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात आदिवासी विकास विभागाच्यावतीने खावटी अनुदान योजना मंजुर करण्यात आली होती.

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने ९ सप्टेंबर, २०२० रोजी खावटी अनुदान योजना मंजुर करण्यात आली होती. या योजनेतील अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दोन हजार रुपये रोख स्वरुपात त्यांच्या बँक खात्यामध्ये तसेच दोन हजार रुपयांचा अन्नधान्य स्वरुपात वस्तु आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत देण्यात येत आहेत. त्यानुसार डहाणू, तलासरी, पालघर व वसई या चार तालुक्यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत ६०२९० लाभार्थ्यांचे अर्ज खावटी अनुदानासाठी प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ५८८३२ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटींची पुर्तता करून त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे.

- Advertisement -

पालघर येथील जिल्हा परिषद शाळा वेवूर येथे खावटी अनुदान वाटप योजना अंतर्गत धान्य किटस वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू आशिमा मित्तल, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. उज्जला काळे, नगरपालिका सभापती, नगरसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खावटी अनुदानासाठी प्राप्त असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना धान्याचे किटस वाटप करण्यात आले. कोणीही पात्र लाभार्थी खावटी अनुदानापासून वंचित राहिला असल्यास ग्रामपंचायतस्तरावरून ग्रामसेवक, तलाठी, आदिवासी विभागाचा प्रतिनिधी यांनी ग्रामस्तरीय समितीकडे संपर्क साधावा, असे आवहान प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी केले.

हेही वाचा –

हिंदमाता येथे पाच फुटापर्यंत साचणारे पाणी आता फक्त गुडघाभर; महापौरांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -