घरपालघरजव्हार प्रकल्पातील लाभार्थ्यांना खावटी योजनेंतर्गत किटचे वाटप

जव्हार प्रकल्पातील लाभार्थ्यांना खावटी योजनेंतर्गत किटचे वाटप

Subscribe

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा असे ४ तालुके येत असून त्यातील आदिवासी लाभार्थींचे जीवनमान सुधारावे या हेतूने राज्य सरकारने खावटी योजनेत बदल केला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा असे ४ तालुके येत असून त्यातील आदिवासी लाभार्थींचे जीवनमान सुधारावे या हेतूने राज्य सरकारने खावटी योजनेत बदल केला आहे. त्यांनी आदिवासी लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट व प्रत्येकी २ हजार रुपये, असे जव्हार प्रकल्पातील एकूण ७१ हजार ८०९ लाभार्थ्यांना १३ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये अनुदान आदिवासींच्या खात्यात जमा केले आहे. खावटी योजनेंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना आर्थिक रकमेचा लाभ देण्यात येतो. याअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांची रक्कम जमा केली जाते. यासाठी सरकारच्या नियमानुसार प्रकल्प कार्यालयाने चांगल्या प्रकारे हा उपक्रम हाताळला असून ही योजना प्रभावीपणे राबवली असल्याने ४ ही तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटात आदिवासी मजुरांची उपासमार होऊ नये. यासाठी खावटी योजनेचे पुनरुज्जीवन करुन आदिवासींना २ हजार रुपये रोख व २ हजार रुपयांचे किराणा किट, खावटी किटचा लाभ मिळाला आहे. इतरही पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ दिला जाणार आहे.
– विजय मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार 

- Advertisement -

राज्य शासनाच्या नोंदणीकृत पोर्टलवर जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत ७१ हजार ८०९ लाभाथ्यांची नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली. त्या कुटुंबांना रक्कम अदा करण्यात आली. लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यश आले आहे. नाममात्र लाभार्थी आधार व्हेरिफिकेशन, बँक अकाऊंट चेक आदी कारणांमुळे या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. मात्र, या त्रुटींची पूर्तता पूर्ण होताच त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जव्हार प्रकल्पांतर्गत सांगण्यात आले आहे.

एकूण लाभार्थी संख्या व प्राप्त अनुदान 

  • परितक्त्या महिला लाभार्थी : २८ रुपये
  • घटस्फोटित महिला लाभार्थी : ३६३ रुपये
  • अनाथ मुलांचा सांभाळ करणारे कुटुंब: १२१ रुपये
  • वनहक्क लाभार्थी: १०११६ रुपये
  • भूमिहीन लाभार्थी: ८५५७ रुपये
  • मनरेगा लाभार्थी: २८५५४ रुपये
  • इतर परितक्त्या  लाभार्थी : ५ रुपये
  • अपंग लाभार्थी: १२६५ रुपये
  • विधवा लाभार्थी: ११७८९ रुपये
  • कातकरी लाभार्थी: ११०१० रुपये
  • एकूण लाभार्थी : ७१८०९ रुपये
  • एकूण अनुदानित रक्कम: १३ कोटी,७२ लाख ६० हजार रुपये

हेही वाचा –

मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -