घरपालघरबारस पुजून होते आदिवासींच्या दिवाळीला सुरूवात

बारस पुजून होते आदिवासींच्या दिवाळीला सुरूवात

Subscribe

गावातील भगतासह जुनी जाणकार माणसे सिमेवर जमा होतात. गावातून शेरभर तांदूळ घरोघरी जाऊन जमा करतात.

मोखाडा : वाघ देवतेच्या पुजनाने आदिवासी बांधवांची दिवाळी वाघबारशी म्हणून साजरी होते.आदिवासी समाज हा निसर्गपूजक असल्याने निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे. निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना. जल, जंगल, जमीन यावर आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या हक्क सांगत आला आहे.त्यामुळे आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणून बारशी साजरा केला जातो. या सणानिमित्ताने गाव सिमेवर वाघ देवतेची पूजा गावोगावी होते. त्यानंतर खर्या अर्थाने दिवाळी सणाला सुरूवात होते.आतापर्यंत आदिवासी बांधव हाच सण परंपरे नुसार वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करत आला आहे. वाघ बारसीच्या दिवशी गाव सिमेवर ’ बारस ’ पुजली जाते. गावातील भगतासह जुनी जाणकार माणसे सिमेवर जमा होतात. गावातून शेरभर तांदूळ घरोघरी जाऊन जमा करतात.

पाच कोंबडीचा बळी, शेंदुर चढवून वाघ देवाची पूजा केली जाते.’ यावर्षी आमच्या लक्ष्मीचे रक्षण तू जंगलात केलेस तसेच पुढे पण कर ’ अशी विनवणी वाघदेव, नागदेव,सुर्यदेव यांना करुन नवीन धान्याची कणसे, नागली, उडीद वाहिले जाते.येथे जंगलातील रानभूत, डोंगर्‍यादेव, निळादेव, हिरवा देव, कणसरा, रानवा, गावदेवी, गाय या सर्व ज्ञात अज्ञात देव देवता सर्वांची विधीवत पूजा केली जाते. एकीकडे आदिवासी आपली संस्कृती जोपासत आहेत. मात्र दुसरीकडे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासींवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. आपली आदिवासी म्हणून असलेली ओळख पुसली जाईल की काय ? अशी भिती व्यक्त करत होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -