घरपालघरवसई-विरार महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट

वसई-विरार महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट

Subscribe

विशेष म्हणजे १८ ऑक्टोबरला प्रत्येकाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे यंदा महापालिकेच्या स्थायी, अस्थायी कर्मचार्‍यांसह ठेकेदारांचीही दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.

वसई: वसई -विरार महापालिकेच्या कर्मचार्‍यांना यंदा दिवाळीसाठी बारा हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर ठेका पध्दतीवरून कर्मचार्‍यांना बोनससह पगार मिळणार आहे. इतकेच नाही तर ठेकेदारांनाही त्यांच्या बिलातील किमान पंचवीस टक्के रक्कम अदा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे १८ ऑक्टोबरला प्रत्येकाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे यंदा महापालिकेच्या स्थायी, अस्थायी कर्मचार्‍यांसह ठेकेदारांचीही दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.
वसई- विरार महापालिकेच्या स्थायी अधिकारी-कर्मचार्‍यांना बारा हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अस्थायी कर्मचार्‍यांनाही सानुग्रह अनुदान मिळणार आहे. महापालिकेच्या आस्थापनावर चार हजार सफाई कर्मचारी ठेका पध्दतीवर कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कापून ती दिवाळीपूर्वी बोनस म्हणून दिली जाते. त्यांना ही रक्कम मिळावी म्हणून महापालिकेकडून त्यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम ठेकेदारामार्फत कामगारांच्या बँक खात्यात पाठवली जाणार आहे. ठेकेदाराला ही रक्कम कामगारांच्या खात्यात १८ ऑक्टोबरला जमा करावी लागणार आहे. ठेकेदाराने ती रक्कम पाठवली की नाही याची खातरजमा करण्यासाठी आयुक्त पवार यांनी प्रत्येक कामगारांचे बँक स्टेटमेंट मागवून घेण्याचे निर्देशही संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे यंदा सफाई कर्मचार्‍यांचीही दिवाळी गोड असणार आहे.
महापालिकेकडून दिव्यांगांना अनुदान दिले जाते. तेही अनुदान येत्या १८ ऑक्टोबरला देण्याचे निर्देश आयुक्त पवार यांनी दिले आहेत. महापालिकेच्या ठेकेदारांनाही दिवाळीत कामगारांचा पगार आणि इतर देणी द्यावी लागतात. याचा विचार करून आयुक्तांनी प्रत्येक ठेकेदाराला किमान २५ टक्के रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनाही येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत ती रक्कम मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेचे कार्यालय सुट्टीच्या दिवशी म्हणजे १५ आणि १६ ऑक्टोबरला सुरु राहणार आहे. दिवाळीत आर्थिक अडचण येऊ नये. सगळ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -