घरपालघरविद्यार्थ्यांबरोबर पालिका अधिकार्‍यांचा दिवाळी फराळ

विद्यार्थ्यांबरोबर पालिका अधिकार्‍यांचा दिवाळी फराळ

Subscribe

तसेच स्वतः आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व अधिकारी यांच्या हस्ते फराळ वाटप करून आयुक्त व सर्व अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला.

भाईंदर :- सर्वात मोठा सन दिवाळी येत्या काही दिवसांवर येऊन पोहोचलेली असताना पालिका आयुक्त संजय काटकर आणि अधिकार्‍यांनी स्तुत्य उपक्रम करत ८ नोव्हेंबर रोजी चेना येथील निवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सणानिमित्त स्नेहफराळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी केली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मानोरकर,उपायुक्त संजय शिंदे, मारुती गायकवाड, रवि पवार, शिक्षणाधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक आयुक्त व महापालिका शिक्षक उपस्थित होते.

सदर निवासी वस्तीगृहात ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनाथ व एक पालक नसलेले ४५ विद्यार्थी राहत असून महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी अशी निवासी वसतिगृह आहे. आयुक्तांनी यंदाच्या वर्षी आपण शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी फराळ करावा अशी भावना व्यक्त केली. त्याअनुषंगाने महापालिका हद्दीतील निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी करून त्यांचे मनोबल वाढवले. तसेच स्वतः आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व अधिकारी यांच्या हस्ते फराळ वाटप करून आयुक्त व सर्व अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

 

वसतिगृहाची आयुक्तांकडून पाहणी

- Advertisement -

सदर निवासी वसतिगृहाची आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी करताना आयुक्तांनी वापरात न येणार्‍या जागेचा पुरेपूर वापर करून इतर जागेत झालेली अडगळ कमी करून घेण्याच्या सूचना दिल्या. निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, आहार, राहण्याच्या सोयी सुविधा, अत्याधुनिक शिक्षण, डिजिटल शाळा व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही आयुक्त काटकर यांनी दिली .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -